Jalgaon News | मांजाने कापला डॉक्टरचा गळा, प्रचंड खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Jalgaon News | दुचाकीवरुन जात असताना खांबाला अडकलेल्या चायना मांजामुळे (chinese manjha) एका तरुण डॉक्टरचा गळा चिरला (slits throat). ही धक्कादायक घटना जळगाव शहरात (Jalgaon News) घडली असून या घटनेत डॉक्टर गंभीर जखमी (doctor seriously injured) झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर डॉक्टर गंभीर अवस्थेत 10 मिनीटे रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. मात्र, त्यांच्या मदतीसाठी कोणीही धावून आले नाही. लोकांनी फक्त बघण्याची भूमिका घेतली. मात्र एका रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने या डॉक्टरचे प्राण वाचले. जळगावमध्ये (Jalgaon News) घडलेल्या या घटनेनंतर चायना मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जवाद अहमद Javed Ahmed (रा. अमरावती सध्या रा. सालार नगर, जळगाव) यांचे वैद्यकीय शिक्षण (Medical education) पूर्ण झाले असून ते सध्या जळगावमध्ये प्रॅक्टिस करीत आहेत. डॉ. अहमद हे त्यांच्या दुचाकीवरुन जात असताना महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपाजवळ चायना मांजा अचानक त्यांच्या गळ्यावर आला आणि लगेच त्यांचा गळा कापला गेला. गळा कापला गेल्यानंतर ते रक्तबंबाळ अवस्थेत दुचाकीवरुन खाली कोसळले.

स्वत: डॉक्टर असल्याने त्यांनी स्वत:ची सुरक्षा लक्षात घेत रक्तस्त्राव रोखण्यासाठी गळा दाबून ठेवला. सुमारे दहा मिनटे या मार्गावरुन येणारे-जाणारे लोक त्यांच्याकडे पाहत होते. परंतु त्यांच्या मदतीसाठी कोणी आले नाही. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या कलीम शेख या रिक्षाचालकाने (Rickshaw driver Kalim Sheikh) प्रसंगावधान राखून जखमी डॉक्टरांना आपल्या रिक्षात बसवून रुग्णालयात नेले.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

रुग्णालयातील वैद्यकीय प्रमुख डॉ. मिनाज पटेल Dr. Minaj Patel, नर्सिंग सुप्रीटेडन्ट हर्षल पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) करुन रक्तस्त्राव रोखला.
डॉ. अहमद यांच्या गळ्यात 1 आणि गळ्यावर 11 टाके घेण्यात आले.
मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने आणि त्यांच्या हृदयाचे ठोके कमी पडू लागल्याने त्यांची प्रकृती नाजूक बनली होती.
मात्र, त्यांना वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले, अन्यथा त्यांच्या जीवावर बेतले असते असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

Web Title : Jalgaon News | chinese manjha slits throat of biker doctor in jalgaon

 

Pune Crime | KYC अपडेट करणे पडले महागात, ऑनलाइन 2.25 लाखांचा गंडा

BCCI | रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह ! भारताच्या तिन्ही कोचसह चौघे आयसोलेशनमध्ये

Car Loan | सहजपणे पाहिजे असेल कार लोन तर ‘या’ 6 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होऊ शकते नुकसान; जाणून घ्या