Jalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon News | कौटुंबिक गरज भागवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी जमिनी एका सावकाराकडे गहाण ठेवल्या होत्या, पण त्या सावकाराने त्यांच्या अडचणींचा गैरफायदा उचलत गहाण ठेवलेल्या जमिनी परस्पर विकून टाकल्या. ही घटना जळगावची आहे. तुम्ही म्हणाल यात नवीन काय? ही महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतील शोकांतिका आहे. अशा अनेक घटना दरवर्षी महाराष्ट्रात घडत असतात. पण जर आम्ही म्हणालो की जळगावच्या त्या शेतकऱ्यांना त्यांची शंभर एकर जमीन माघारी मिळाली आहे, (Jalgaon News)

हो तुम्ही बरोबर वाचलंत, शेतकऱ्यांची सावकाराने हडपलेली शंभर एकर जमीन त्यांना माघारी मिळाली आहे. वैध सावकारी करत सावकाराने बळकावलेली तब्बल 100 एकर जमीन त्या शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिले आहेत. यामुळे त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सावकाराने परस्पर विकलेल्या या जमिनी परत मिळवण्यासाठी केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे या शेतकऱ्यांना त्यांची तब्बल 100 एकर एवढी शेतजमीन परत मिळवून दिली आहे. (Jalgaon News)

जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अवैध सावकारावर केलेली ही कारवाई महाराष्ट्रातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे, असे मानले जात आहे.
गरजेच्या काळात या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी एका अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराकडे गहाण ठेवल्या होत्या. या सावकाराने त्यांच्या जमिनी एक एक करून विकायला सुरुवात केली. पण पैसे परत करण्याची क्षमता नसल्याने हे शेतकरी हतबल झाले होते. पण या प्रकरणाला वाचा फुटली आणि जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांना या प्रकाराची माहिती मिळाल्यावर त्यांनी लगेच संपूर्ण यंत्रणा कामाला लावली.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तसेच सावदा तालुक्यातील एकूण पंधरा शेतकऱ्यांची एकूण शंभर एकर जमीन सावकारांनी हडपली होती.
याची माहिती मिळताच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कारवाई करत ती जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याचे आदेश काढले आहेत.
सदरच्या जमिनीची कागदपत्रे संबंधित शेतकऱ्यांना सुपूर्त करण्यात आले आहेत.
तरी, काही शेतजमिनींवर बांधकाम झाल्यामुळे जमिनीच्या बदल्यात त्या शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title :- Jalgaon News | deputy registrar returned 100 acres of land seized by moneylenders to farmers families got emotional

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली

Raj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे