Jalgaon News | पोलीस भरतीच्या चाचणीत मैदान गाजवत 90 गुण मिळवले; मात्र नशिबाने केला घात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon News | कोणाच्या नशिबात काय लिहिले असेल याचा काही कोणालाच थांगपत्ता नसतो. याचाच प्रत्यय जळगाव येथील तरुणाच्या बाबतीत पाहायला मिळाला आहे. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी घेऊन पोलीस भरतीची तयारी देखील केली, पोलीस भरतीचा दिवस आला मैदान देखील गाजवले. तब्बल 90 मार्क मिळवत आपली हुशारी दाखवली. मात्र ही आनंदाची वार्ता घरी पोहोचवण्याआधीच तरुणाची प्रकृती अचानक खालावली आणि उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. (Jalgaon News)

रोशन भैरू पवार (वय 22) राहणार पहूर तालुका जामनेर असे मृत तरुणाचे नाव आहे. रोशनच्या मागे एक भाऊ, एक बहीण, आई-वडील असा परिवार आहे. रोशनच्या घरची परिस्थिती हलाकीची आहे. वडील मजुरी करतात तर रोशन हा खूपच हुशार होता. त्याचा मोठा भाऊ देखील वडिलांसोबत मजुरी करत होता. घरची परिस्थिती सुधारायची, घरात चांगले दिवस आणायचे, पोलीस बनायचे असे स्वप्न मनाशी धरून रोशनने आजवर खूपच मेहनत घेतली होती. दररोज पहाटे पाच वाजता उठून रोशन धावण्यासह व्यायाम करत असे. त्याचबरोबर लेखी परीक्षेत देखील कुठेही आपण कमी पडू नये म्हणून तो गावातील वाचनालयात जाऊन अभ्यास करत असे. पहिल्याच भरतीला पोलीस व्हायचे रोशनचे स्वप्न होते.

रोशनचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. त्यानंतर पुण्यातील पोलीस भरतीच्या जागांसाठी त्यांनी अर्ज भरला. सोमवारी तो पुण्यात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी असल्याने रविवारीच पुण्याकडे रवाना झाला. सोमवारी त्याने भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मैदानी चाचणी पूर्ण केली. यावेळी अचानक त्याला जुलाब आणि उलटीचा त्रास होऊ लागला. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथील स्थानिक डॉक्टरांना दाखवून त्याच्यावर उपचार केले. त्याची प्रकृती थोडीशी ठीक झाली. त्यानंतर तो पुण्यातून रेल्वेत बसून घरी निघाला. यादरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यावर त्याची प्रकृती खूपच खालावली. (Jalgaon News)

यावेळी नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
कुटुंबीय देखील येथे पोहोचले आणि रोशनला जामनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
जामनेर येथे उपचार सुरू असतानाच रोशनची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि दुपारी त्याचा मृत्यू झाला.
रोशनच्या या अचानक मृत्यूने त्याच्या कुटुंबासह ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला आहे.
त्याच्या जाण्याने गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title :- Jalgaon News | jalgaon youth dies after police recruitment test

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अखेर अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व नाकारले; ‘या’ देशाच्या नागरिकत्वासाठी केला अर्ज

Nayanthara | साऊथ सुपरस्टार नयनतारा अभिनय सोडणार? लग्न- मुलांच्या जन्मानंतर तिने केला मोठा खुलासा

Prajakta Mali | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची लेडी क्रश आहे प्राजक्ता माळी; प्राजक्ता माळीची लेसबियन पार्टनर व्हायची इच्छा केली व्यक्त