Jalgaon News | दुर्देवी ! खेळताना उकळत्‍या दुधात पडून दिड वर्षाच्या बालकाचा मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon News | बहिणीसोबत घरात खेळत असताना अडीच वर्षीय चिमुकला उकळत्‍या दुधात पडला. यामुळे तो भाजला गेला होता. तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता मात्र उपचारादरम्यान त्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यु (Died) झाला आहे. ही घटना धरणगाव (Jalgaon News) तालुक्यातील पिंप्री खुर्द या ठिकाणी घडली आहे. रोहन सुभाष धोबी (Rohan Subhash Dhobi) (वय, अडीच वर्ष) असं त्या बालकाचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी, संबधित घटना 13 ऑक्टोबरला घडली आहे. रोहनचे आजोबा डेअरीवर कामाला असून घरी दररोज 3 लीटर दूध येते. सकाळी घराबाहेर चुलीवर दुध तापवायला ठेवले होते. या दरम्यान रोहन बहिणीसोबत खेळत असताना उकळत्या दुधात पडून तो 36 टक्के भाजला होता. त्याला तात्काळ जळगाव रुग्णालयात दाखल (Jalgaon News) करण्यात आले होते.

 

दरम्यान, जळगाव (Jalgaon News) येथे प्राथमिक उपचार केल्‍यानंतर बालकाला पुढील उपचारांसाठी १४ ऑक्‍टोंबरला मुंबई येथे दाखल केले. 8 ते 10 दिवस उपचार झाल्‍यानंतर 24 ऑक्‍टोंबरला चिमुकल्याचा मृत्यु (Died) झाला. चिमुकल्याच्या दुर्देवी मृत्युमुळे आई, वडील व आजोबांनी आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title :- Jalgaon News | Unfortunate ! pimpri village fell into boiling milk while playing little child death

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 88 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune NCP | पुण्यात राष्ट्रवादीकडून हवन करत आंदोलन; शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले – ‘भाजप भ्रष्टाचाराचा इतिहास रचतयं’ (व्हिडीओ)

MLA Madhuri Misal | सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करा – आमदार माधुरी मिसाळ