पुण्यातील महिलेच्या पर्समधील 1.25 लाखाचा ऐवज लंपास

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नसमारंभासाठी पुण्याहून आलेल्या एका महिलेच्या पर्समधील सव्वा लाखांचा ऐवज बसप्रवासात लांबविण्यात आला. या प्रकरणी सुनिता रामकृष्ण पाटील (४८, रा.देहु रोड, आळंदी, पुणे)  यांनी येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजता घडली.

सुनिता पाटील यांचे पती रामकृष्ण पाटील यांच्या भाच्याचे पाचोरा येथे रविवारी लग्न असल्याने पुणे येथून ते खाजगी बसने जळगावात आले. दुपारी चार वाजता पाचोरा बसमध्ये चढत असताना सुनिता यांच्या पर्समधील १ लाख ५ हजार रुपयांची ४२ ग्रॅमची सोन्याची पोत व दहा हजार रुपये चोरट्याने लांबविण्यात आले.  बसमध्ये चढल्यावर हा प्रकार लक्षात आला.

Loading...
You might also like