जिल्हा वाहतूक शाखा व नियंत्रण कक्ष बरखास्त 

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन

 

पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची कमतरता असताना जिल्हा वाहतूक शाखा आणि भुसावळ येथील नियंत्रण शाखेत एकूण १०२ कर्मचारी नियुक्तीला होते. या दोन्ही शाखांकडून पोलीस दलाला उपयुक्त असे कोणतेच काम होत नसल्याने या दोन्ही शाखा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी (दि.२९) बरखास्त केल्या. या शाखामध्ये नियुक्तीस असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यातील रिक्त जागेवरती नियुक्त करण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’33d0c191-c48a-11e8-ac5f-bb8372ad741e’]

जळगाव जिल्हा वाहतूक शाखेत ६५ तर भुसावळ नियंत्रण कक्षात ३७ कर्मचारी नियुक्तीला होते. या शाखांकडून कोणतेच उपयुक्त काम होत नसल्याने या शाखा बरखास्त करण्याचा निर्णय अधीक्षकांनी घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांची जिल्हा वाहतूक शाखेत तीन वर्षे पूर्ण झाली नाहीत अशा कर्मचाऱ्यांना भुसावळ येथील वाहतूक शाखेत नियुक्त करण्यात येणार आहे. तर जे कर्मचारी वारंवार वाहतूक शाखेत बदलून आले आहेत अशांना पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी शनिवारी प्रत्येक कर्मचाऱ्याचे नियुक्तीचे ठिकाण आणि विनंतीचे ठिकाण जाणून घेतले.
[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2f7616a1-c486-11e8-87ac-279451877f5b’]

वाढती गुन्हेगारी आणि पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळेच अधीक्षकांनी हा निर्णय घेतला असणार अशी चर्चा सध्या पोलीस दलात सुरु आहे. तसेच काही विशिष्ट कर्मचाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. भुसावळ शहर पोलीस ठाण्यात १११ कर्मचारी मंजूर आहेत मात्र फक्त ५६ कर्मचारी कार्य़रत असून ६५ पदे रिक्त आहेत. बाजारपेठ पोलीस स्टेशनला १०३ कर्मचारी मंजूर आहेत, त्यापैकी ८५ कर्मचारी कार्यरत असून १८ पदे रिक्त आहेत. शहर वाहतूक शाखेत १८ कर्मचारी मंजूर आहेत, प्रत्यक्षात १० कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान, वाहतूक शाखेचे कर्मचारी मुळ काम सोडून इतर उद्योग जास्त करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

भुसावळ नियंत्रण कक्ष व जिल्हा वाहतूक शाखेला कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शनिवारी बोलावण्यात आले होते. सोमवारी या सर्वांना नवीन ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल. दोन्ही शाखा आता बरखास्त झालेल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्याने यापूर्वी कधीच वाहतूक शाखेत काम केलेले नाही, त्यांना वाहतूक शाखेत तर ज्यांनी याआधी काम केले आहे, त्यांना इतर पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली जाईल असे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.