जल्लीकट्टू : परंपरेचा ‘रक्तरंजित’ खेळ, 20 वर्षात 200 जण ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आस्था आणि विश्वासाने जगणारे नेहमी चमत्कारालाच नमस्कार करत असतात. जर तुम्ही तर्कशास्त्रीय दृष्ट्या गेला तर एकतर तुम्हाला नास्तिक म्हणून घोषित करण्यात येईल किंवा मग जीवाला धोका तरी होईल. असाच एक जीव धोक्यात टाकणारा खेळ तमिळ लोक खेळत असतात. परंपरेच्या नावाखाली हा खेळ खेळला जातो. या रक्तरंजित खेळात २० वर्षात तब्बल २०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीही हा खेळ अजून चालूच आहे.

जल्लीकट्टू हा खेळ दोन शब्दांनी बनलेला असून तमिळ लोकांसाठी हा खेळ खूप अर्थपूर्ण आहे. यात जली म्हणजे नाणे आणि कट्टू म्हणजे बांधणे. प्रथेनुसार माणूस व बैल यांच्यात होणाऱ्या या खेळात बैलाच्या टोकदार शिंगांवर नाणींची छोटी पिशवी बांधली जात होती. मात्र आता केवळ बैलांवर नियंत्रण ठेवणारेच विजयी मानले जातात.

मृत्यूचा खेळ
जल्लीकट्टू खऱ्या अर्थाने बैलाबरोबर माणसाच्या मृत्यूच्या खेळाचे नाव आहे. असा खेळ जिथे प्रत्येक क्षणाला जीवन मरणाचा धोका असतो. रागाने भरलेले शेकडो बैल माणसाच्या पोटात शिंगे खुपसण्यासाठी एका दाराच्या मागे बंद केलेली असतात आणि दाराच्या दुसर्‍या बाजूला लोकांची गर्दी बैलांना आपल्याकडे बोलावण्यासाठी चिथवत असतात. आणि त्या क्षणी दरवाजा उघडला जातो आणि सुरु होतो रक्तरंजीत खेळ. तामिळनाडूमध्ये या खेळाला खूप महत्व प्राप्त आहे. जल्लीकट्टू ही प्रथा दक्षिण भारतातील अनेक प्रथांपैकी एक आहे. तीन दिवस चालणारा हा खेळ आता बऱ्याच ठिकाणी आयोजित करण्यात येतो. परंतु जास्त करून या खेळास मदुरैमध्ये खेळले जाते. आणि विशेष म्हणजे येथूनच या खेळाची सुरुवात झाली आहे. या जल्लीकट्टू खेळाचे लोक वेडे आहेत.

लोक जल्लीकट्टूचे वेडे आहेत
हा खेळ सुरु होतो तेव्हा काहीजण बैलाचे शिंग धरतात तर काही लोक बैलाचा पाय धरतात. शेकडो लोकांची गर्दी अशा प्रकारे बैलावर तुटते की ही गर्दी स्वत:ला बैलापेक्षा अधिक सामर्थ्यवान सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करते. यापैकी जे लोक बैलाला काही सेकंद थांबविण्यात सफल होतात. ते विजेते असतात. अर्थात असे वेडेपणा ज्यात असेल त्याला बक्षीसही मोठे मिळते. अशा विजेत्याचे रोख पारितोषिक लाखो रुपयांपर्यंत असते.

जल्लीकट्टू पोंगलच्या दिवशी घडते
उत्तर भारतात मकरसंक्रांती साजरी केली जात असते त्याच वेळी दक्षिण भारतात पोंगल साजरी केली जाते. मकरसंक्रांतीच्या सणालाच दक्षिण भारतात पोंगल म्हटले जाते आणि या दिवशीच हा खेळ खेळला जातो. या खेळासाठी बैलांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यांची शनिगे धारदार आणि तीक्ष्ण केली जातात.

मृत्यूची आकडेवारी
परंपरेच्या नावाखाली खेळलेला हा खेळ किती धोकादायक आहे ही याची आकडेवारीच सांगते. या परंपरेशी संबंधित आकडेवारीवर नजर टाकल्यास २०१० ते २०१४ या काळात जवळपास १४ जणांनी आपला जीव गमावला आहे. जर आपण मागील २० वर्षांबद्दल बघितले तर या खेळामध्ये आतापर्यंत २०० लोक मरण पावली आहेत.

जल्लीकट्टूसारख्या बैलांच्या लढाईचा खेळ एकट्या भारतात नाही तर इटली आणि स्पेन येथेसुद्धा हा मृत्यूचा खेळ प्रसिद्ध आहे. हा खेळ बंद करण्यासाठी येथेही बरेच प्रयत्न केले गेले आहेत पण अजूनही हा मृत्यूचा खेळ परंपरेच्या नावाखाली सुरूच आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/