Jalna ACB Trap | ग्राहकाकडून लाच घेताना महावितरणच्या कर्मचाऱ्यासह एजंट ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – तोडलेले वीज कनेक्शन (Power Connection) पुन्हा जोडण्यासाठी महावितरणच्या (MSEDCL) ग्राहकाकडून 3 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) घनसांगवी तालुक्यातील राणी उचेगाव येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ आणि एका खाजगी व्यक्तीला जालना एसीबीच्या पथकाने (Jalna ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. वरिष्ठ तंत्रज्ञ सुरेश प्रकाश गुंजाळ Technician Suresh Prakash Gunjal (वय 30), खासगी व्यक्ती बालाजी भिकाजी शिंगटे (वय 35) असे लाच घेणाऱ्यांची नावे आहेत. जालना एसीबीने (Jalna ACB Trap) ही कारवाई सोमवारी केली.

याबाबत 49 वर्षाच्या व्यक्तीने जालना एसीबीकडे (Jalna ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार हे महावितरणचे ग्राहक आहेत. त्यांच्या घरी असलेले वीज कनेक्शन वीज बिल न भरल्यामुळे तोडण्यात आले होते. ते वीज कनेक्शन परत जोडून देण्यासाठी सुरेश गुंजाळ यांनी तीन हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जालना एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने पंचा समक्ष पडताळणी केली असता सुरेश गुंजाळ याने वीज कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी तीन हजार रुपये लाच मागितल्याचे (Demand a Bribe) निष्पन झाले. पथकाने सापळा रचून लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले. तर खासगी व्यक्तीने लाच घेण्यास प्रोत्साहित केल्याने बालाजी शिंगटे याला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe) यांच्या मार्गदर्शनाखाली जालना एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर
(DySP Sudam Pachorkar), पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मस्के, जावेद शेख, गणेश बुजाडे, कृष्णा देठे,
गजानन कांबळे, शिवाजी जमधडे, गजानन कांबळे, प्रवीण खंदारे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Jalna ACB Trap | Anti-corruption agent caught with Mahavitran employee while taking bribe from customer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik ACB Trap | 40 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा लिपिक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | विमानाने पुण्यात येऊन महागडे फोन चोरणारी आंतरराज्यीय टोळी विमानतळ पोलिसांकडून गजाआड, 30 लाखांचे मोबाईल जप्त

Aaditya Thackeray | सहा महिन्यात बारावे कारण दिलंय, तरीही ते गद्दारच!, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला