Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – वडीलोपर्जीत जमिनीवर फेरफार नोंदी करण्यासाठी कन्नड तालुक्यातील मौजे पिशोर येथील महिला तलाठ्यासह कोतवाल याला 30 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalna ACB Trap) रंगेहाथ पकडले. जालना एसीबीने (Jalna ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.22) केली.

महिला तलाठी दिपाली योगेश बागुल Talathi Dipali Yogesh Bagul (वय 32), कोतवाल शेख हारुन पिता शेख छोटु (वय 41) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. याबाबत 54 वर्षाच्या व्यक्तीने 22 फेब्रुवारी 2023 रोजी जालना एसीबीकडे (Jalna ACB Trap) तक्रार केली होती.

तक्रारदार यांचे मौजे भारंबा शिवारात वडीलोपर्जित जमीन आहे. तक्रारदार व इतर दोघा भावांची नावे फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी दिपाली बागुल यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जालना एसबीकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी दिपाली बागुल आणि कोतवाल यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून तीस हजार रुपये लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe) यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद एसीबीचे पोलीस निरीक्षक एस.एस.शेख (Police Inspector S.S. Sheikh) पोलीस अंमलदार गणेश चेके, जावेद शेख, गणेश बुजाडे, गजानन कांबळे, प्रवीण खंदारे यांच्या पथकाने केली.

Web Title :Jalna ACB Trap | Female Talathi, Kotwal in anti-corruption net while accepting bribe of 30 thousand rupees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ajit Pawar | ‘डीजीआयपीआर’मधील 500 कोटींच्या घोटाळ्याला दाबण्याचा सरकारचा प्रयत्न ;विरोधी पक्षनेते अजित पवारांचा आरोप

Maharashtra Budget 2023 | धनगर समाजासाठी मोठी घोषणा ! समाजाला 1000 कोटी रुपये, 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज