Jalna ACB Trap | वाळुची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाकडून 12 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – वाळुची (Sand) वाहतूक करण्याऱ्या ट्रॅक्टर मालकाकडून हप्ता (Installment) म्हणून 12 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) मौजीपुर पोलीस ठाण्यातील (Maujipur Police Station) पोलीस अंमलदार व खासगी व्यक्तीला (हॉटेल मालक) जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalna ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. जालना एसीबी युनिटने (Jalna ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी (दि.7) एका हॉटेलमध्ये केली. पोलीस अंमलदार चैनसिंग कपुरचंद नागलोत (Chain Singh Kapurchand Naglot) आणि हॉटेल मालक ‍ज्ञानेश्वर उर्फ माऊली सुभाषराव रायमुले Dnyaneshwar alias Mauli Subhashrao Raimule (वय-36 रा. डांबरी ता.जि. जालना) अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत 32 वर्षाच्या तक्रारदाराने जालना एसीबीकडे (Jalna ACB Trap) गुरुवारी (दि.6) तक्रार केली आहे. तक्रारदार हे दुधना नदीच्या (Dudhana River) पात्रातून वाळू उपसा करुन त्याची ट्रॅक्टर (MH 20 EE 3844) मधून वाहतूक करतात. नदी पात्रातुन वाळू उपसा करण्यासाठी तक्रारदार यांनी रितसर रॉयल्टी (Royalty) भरली आहे. मात्र, तक्रारदार यांचा वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलीस अंमलदार चैनसिंग नागलोत यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदार यांच्या तक्रारीची गुरुवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता,
तक्रारदार यांच्याकडे पोलीस अंमलादर चैनसिंग नागलोत याने खासगी व्यक्ती माऊली रायमुले याच्यामार्फात फोन करुन 15 हजार रुपये लाच मागितली.
तसेच तडजोडी अंती 12 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
नागलोत याने लाचेची रक्कम रायमुले यांना देण्यास सांगितले. शुक्रवारी माऊली रायमुले यांच्या हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला.
नागलोत याच्या सांगण्यावरून रायमुले याला तक्रारदार यांच्याकडून 12 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
पुढील तपास जालना एसीबीचे पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे (SP Dr. Rahul Khade), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe), जालना एसीबी पोलीस उप अधीक्षक सुदाम पाचोरक
(Jalna ACB Deputy Superintendent of Police Sudam Pachorak) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर (Police Inspector Shankar Mutekar),
पोलीस अमंलदार गजानन घायवट, गजानन कांबळे ,गणेश भुजाडे, प्रवीण खंदारे, गणेश चेके, ज्ञानेश्वर यांच्या पथकाने केली.

Web Title :-  Jalna ACB Trap | Private ISM anti-corruption net with a policeman while accepting a bribe of 12 thousand rupees from the owner of a tractor transporting sand.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा