जालना : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापुरी बंधाऱ्याचे देयक काढण्यासाठी आलिशान गाडीत साडेआठ लाख रुपयाची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला जालना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (Jalna ACB Trap) रंगेहाथ पकडले. ऋषिकेश प्रल्हादराव देशमुख Rishikesh Prahladarao Deshmukh (वय 34) असे लाचखोर उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याचे नाव आहे. तर भाऊसाहेब दादाराव गोरे (Bhausaheb Dadarao Gore) असे सहकारी लिपिकाचे नाव आहे. जालना एसीबीने (Jalna ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.6) महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद (Maharashtra Water Conservation Corporation Aurangabad) कार्यालयासमोर केली. विशेष म्हणजे जालना युनिटने औरंगाबाद शहरात ही सापळा कारवाई केली. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत 36 वर्षाच्या व्यक्तीने जालना एसीबीकडे (Jalna ACB Trap) तक्रार केली. तक्रारदार हे चौडेश्वरी कंस्ट्रक्शन परभणी (Chaudeshwari Construction Parbhani) या कंपनीच्या नावावरती कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम केले आहे. तक्रारदार यांनी केलेल्या सोनपेठ तालुक्यातील गवळी पिंपळी येथील कामाचे देयक 18 लाख व पुर्णा तालुक्यातील गोविंदपुर कामाचे देयक 1 कोटी 19 लाख रुपये असे मिळुन दोन्ही कामाचे मिळुन 1 कोटी 37 लाख रुपये देयक काढायचे होते. यासाठी व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे (Managing Director Sunil Kushire) यांच्यासाठी 7.5 टक्के प्रमाणे 8 लाख 3 हजार 250 व स्वतःसाठी व महामंडळ कार्यालयाचे मिळून 50 हजार रुपये असे एकूण 8 लाख 53 हजार 250 रुपये लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे करण्यात आली. मात्र तक्रारदाराल लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जालना एसीबीकडे तक्रार केली.
जालना एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली. त्यानंतर पथकाकडून सापळा रचण्यात आला. आरोपींनी त्यांच्या सोबत असलेली इनोव्हा गाडी (एम.एच. 20 एफ जी. 5005) मध्ये लाचेची रक्कम स्विकारली. त्यानंतर दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाच घेणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe), जालना एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर
(DySP Sudam Pachorkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर महादेव मुटेकर
(Police Inspector Shankar Mahadev Mutekar) पोलीस अंमलदार गजानन कांबळे,
जमधडे, बुजाडे, खंदारे गिराम यांच्या पथकाने केली.
Web Title :- Jalna ACB Trap | Sub-Divisional Water Conservation Officer caught in anti-corruption net while taking Rs 8 lakh 53 thousand bribe
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Aurangabad Crime News | धक्कादायक! आईने झोपेतच पोटच्या मुलांचा घेतला जीव; औरंगाबाद हादरलं