Jalna ACB Trap | जमीन नावावर करुन देण्यासाठी 10 हजाराची लाच घेणारा तलाठी लाच लुचपत विभागाच्या ताब्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – वारसा हक्काप्रमाणे जमीन वडिलांच्या नावावरुन आईच्या नावावर करुन घेण्यासाठी शेतकऱ्याकडे लाच (Jalna ACB Trap) मागण्याचा प्रकार जालन्यात घडला आहे. याप्रकरणी जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार कारवाई करत विभागाच्या पोलिसांनी लाचखोर (Jalna ACB Trap) अधिकाऱ्यास रंगेहात पकडत बेड्या ठोकल्या आहेत.

 

विभागाच्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावावर असलेली कुंभार पिंपळगाव शेत गट क्र. 263 मधील 81 आर वारसा हक्कातील जमीन आईच्या नावावर करण्यासाठी तलाठी शिवहार जगननाथ तमशेटे (वय- 48, रा. कुंभार पिंपळगाव, ता. घनसावंगी, जि. जालना) यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितली. याची तक्रार लाच लुचपत विभागास देण्यात आली. त्यानुसार विभागाने सापळा रचत 10 हजार रुपये लाच रोख घेताना पंचांसमोर तमशेटे या लाचखोर तलाठ्यास रंगेहात अटक केली.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे,
पोलीस उप अधीक्षक सुदाम पाचोरकर, पोलिस निरिक्षक एस.एस.शेख, पोलीस अंमलदार गणेश चेके,
गणेश बुजाडे, जावेद शेख यांनी केली.

 

Web Title :- Jalna ACB Trap | Talathi, who took a bribe of 10,000 to get the land registered, is in the custody of the bribery department

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Devendra Fadnavis | सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून विधान, म्हणाल्या – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’

Pune Rural Police | अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडले महागात, पोलिसांकडून पालकांवर खटले दाखल

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…