Jalna Bank Robbery | पुण्यानंतर जालन्यात भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवून दरोडा, रोकड आणि सोनं लंपास

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात (Pune district) बँकेवर सशस्त्र दरोडा (jalna Bank Robbery) टाकल्याची घटना घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती जालन्यात घडली आहे. जालना जिल्ह्यातील (Jalna district) अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेवर (Buldhana Urban Bank)  भरदिवसा सशस्त्र दरोडा (jalna Bank Robbery) पडला आहे. आरोपींनी बंदूकीचा धाक दाखवत बँकेतील पैसे आणि लॉकरमधील सोन्याचे दागिने (Gold jewelry) लंपास केले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.28) दुपारी घडली आहे.

 

शहागड येथील बुलडाणा अर्बन बँकेत दुपारी तीन बंदूकधारे तोंडाला रुमाल बांधून बँकेत आले. त्यांनी जोरजोरात ओरडत कॅश काउंटर जवळील बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत 25 लाख रुपये (Cash) आणि लॉकरमधील सोने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे (Gondi Police Station) पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना बँकेतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Jalna Bank Robbery)

 

आरोपींनी कॅशिअरवरही बंदूक रोखली. त्यानंतर 25 लाखांची रोकड लंपास केली.
याशिवाय आरोपींना बँकेतील काही लॉकर फोडले. त्यांनी लॉकर मधील सोन्याचे दागिने पळवले.
त्यांनी किती किमतीचे दागीने पळवले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
परंतु या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन तपास सुरु केला आहे.

 

Web Title :- Jalna Bank Robbery at buldana urban bank in jalna

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,112 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Superstar Rajinikanth | सुपरस्टार रजनीकांत चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात दाखल

आठ नोव्हेबरला खुला होणार  Paytm चा IPO, जाणून घ्या किंमत, लॉट साईज आणि सर्वकाही