Jalna Crime | विवाहितेची 4 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या; जालना जिल्ह्यातील घटना

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Jalna Crime | एका विवाहितेने तीन मुली व एका मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील (Jalna Crime) अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे घडली. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी उघडकीस आली आहे. गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी (Gangasagar Dnyaneshwar Adani) (वय 32) आणि भक्ती (Bhakati) (वय 13), ईश्वरी (Ishvari) (वय 11), अक्षरा (Akashara) (वय 9) आणि युवराज (Yuvraj) (वय 7), अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत माहिती अशी, काल (गुरुवारी) दुपारी गंगासागर अडाणी आपल्या 4 मुलांसह शेताकडे गेल्या होत्या. सायंकाळी 7 वाजेपर्यंत त्या मुलांसह घरी परतल्या नाहीत. त्यामुळे ज्ञानेश्वर अडाणी आणि तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांचा विहिरीमध्ये तसेच जायकवाडी कालव्यात शोध घेतला. परंतु, गंगासागर आणि मुले सापडले नाहीत. (Jalna Crime)

दरम्यान, आज (शुक्रवारी) सकाळीच काहीजणांनी अडाणी यांच्या शेता जवळच्या गणेश फिसके (Ganesh Fisake) यांच्या विहिरीत या 5 ही जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. याबाबत माहिती समजताच गोंदी पोलीस ठाण्याचे (Gondi Police Station) पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ (PI Sheetal Kumar Ballal) आणि पोलीस पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह पाण्यातून वर काढल्यानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहे.

 

Web Title :- Jalna Crime | married woman with 4 children commits suicide by jumping into a well

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhagat Singh Koshyari | 1 हजार 844 कोटींच्या प्रकल्पांची चौकशी; राज्यपालांचा शिवसेनेला झटका

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 150 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Congress | पुणे शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी पूजा मनिष आनंद तर प्रदेश उपाध्यक्षपदी संगीता तिवारी यांची नियुक्ती

 

Punit Balan Group | पहिली ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदसाठी लढत!

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा विस्फोट ! वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्यात 8067 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Sun And Saturn Together In Capricorn Zodiac Sign | जानेवारी 2022 मध्ये मकर राशीत असतील दोन ‘शत्रु’ ग्रह, ‘सूर्य’ आणि ‘शनी’ची ही युती 5 राशींसाठी अतिशय शुभ