बहिणीसोबत ‘अनैतिक’ संबंध ठेवल्याच्या रागातून तरुणावर 11 सपासप वार करून खून

जालना :  पोलीसनामा ऑनलाइन –   बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत अनैतिक सबंध ठेवल्याच्या रागातून भावाने एका विवाहित तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. तरुणावर धारदार शस्त्राने तब्बल 11 सपासप वार करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि.17) सायंकाळी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साडेगाव येथे घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. शिवाजी विश्वनाथ कासार (वय-29 रा. तीर्थपुरी ता घनसांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी आकाश दगडू कांबळे, संदीप ज्ञानदेव कांबळे यांना घटनेनंतर एका तासात ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध मयत शिवाजी कासार याचा भाऊ ब्रिजेश कासार याने गोंदी पोलिसांत तक्रार दिली असून त्याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी 302,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अंबड न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शिवाजी कासार हा रविवारी नेहमीप्रमाणे मिस्तरीचे काम करण्यासाठी आपल्या तीर्थपुरीतील सहकाऱ्यासह साडेगाव येथे गेला होता. दुपारी साईटवर काम सुरु असताना दुपारी तीनच्या सुमारास तो साडेगाव येथे एका लग्नाला गेला होता. सायंकाळी काम संपून त्याचे सहकारी गावाकडे परतले. दरम्यान, संध्याकाळ झाली तरी शिवाजी गावाकडे आला नसल्याने त्याच्या भावाने ब्रिजेशने सहकाऱ्यांकडे चौकशी केली असता तो दुपारी एका लग्नाला गेला होता, मात्र बांधकाम साईटवर पर आलाच नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाजीचा शोध घेत असताना ब्रिजेशला साडेगाव ते इंदलगाव दरम्यान एका ऊसाच्या शेताजवळ शिवाजीची दुचाकी असल्याची असल्याची माहिती मिळाली. ब्रिजेश त्या ठिकाणी गेला असता त्याला शिवाजी मृतावस्थेत आढळून आला. शिवाजीच्या अंगावर अनेक ठिकाणी धारदार शस्त्राने वार केले होते. खुनाची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे, पोलीस कॉन्स्टेबल महेश तोटे, श्रीधर खडेकर, योगेस दाभाडे यांनी घटनास्थीळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी तपासाची वेगाने सुत्र हवलून आरोपींना एका तासात अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे करीत आहेत.