Jalna Crime News | जमिनीच्या वादातून आरोपीकडून सावत्र भावाची हत्या; जालन्यामधील घटना

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – जालना (Jalna Crime News) जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भार्डी गावामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Jalna Crime News) मोठ्या भावाने आपल्या आठ वर्षीय सावत्र भावाची हत्या (Murder) केली आहे. आरोपी भावाने त्याच्या आठ वर्षाच्या सावत्र भावाचा रुमालाने गळा आवळून व नाकातोंडात चिखल कोंबून खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
भार्डी (Jalna Crime News) येथील तुकाराम कुढेकर (Tukaram Kudhekar) यांनी दोन लग्न केली आहेत. तुकाराम कुढेकर यांची पहिली पत्नी रेखा ही काही कारणाने त्यांना सोडून गेल्यामुळे त्यांनी कावेरी हिच्यासोबत दुसरे लग्न केले. तुकाराम कुढेकर आणि त्याची पहिली पत्नी रेखा यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव ऋषिकेश असून तो आई रेखासोबत छत्रपती संभाजीनगर येथे राहत होता. तर तुकाराम कुढेकर यांची दुसरी पत्नी कावेरी हिला देखील एक मुलगा असून तो भार्डी येथे आई-वडिलांसोबत राहत होता.

पहिल्या पत्नीचा पतीसोबत शेती वाटून घेण्यावरून कोर्टात वाद सुरू आहे. ऋषिकेश हा अधूनमधून गावाकडे येत होता. तो आपल्या आईच्या सांगण्यावरून वडिलांसोबत जमीन वाटून देण्यावरून वाद घालत होता. घटनेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी ऋषिकेश भार्डी गावात आला आणि तो थेट वडिलांच्या घरी गेला. यानंतर त्याने आपला सावत्र लहान भाऊ विराजला गोडीगुलाबीने डाव्या कालव्याच्या बाजूच्या शेतात नेले आणि त्या ठिकाणी त्याने रुमालाच्या साहाय्याने विराज याचा गळा आवळला. यानंतर ऋषिकेशने विराजच्या नाकातोंडात चिखल कोंबला. यानंतर विराजचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.

यानंतर ऋषिकेशने विराज मेल्याची खात्री केल्यानंतर वस्तीवर येऊन त्याने आपण विराजचा खून केला असल्याची माहिती त्याच्या मित्रांना दिली. त्यानंतर मित्रांना विराजला मारल्याचे ठिकाण दाखवून सायकलवरून पळ काढला.
यानंतर त्या मुलांनी गावातील लोकांना याची माहिती दिली. यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी तातडीने कारवाई करून ऋषिकेशला पकडून आणले. या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी
(Gondi Police) घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरु केला.
या प्रकरणी मृत विराजची आई कावेरी तुकाराम कुढेकर (Kaveri Tukaram Kudhekar) यांनी
गोंदी पोलीस ठाण्यात आरोपी ऋषिकेश व त्याची आई रेखा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
गोंदी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.