Jalna Crime News | विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

जालना: पोलीसनामा ऑनलाईन – Jalna Crime News | जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विहिरीवरील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तोल गेल्यामुळे विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल रविवारी 12 मार्च रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. सुदर्शन उर्फ विजय शेषराव कोलते असे यामध्ये मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो 20 वर्षांचा होता. (Jalna Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर गावातील रहिवासी असलेला सुदर्शन हा रविवारी सकाळी शेतातील जनावरांना पाणी पाजण्यासाठी स्वतःच्या विहिरीवरील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेला होता. यादरम्यान त्या विहिरीला कठडे नसल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला. दुर्दैवाने त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सुदर्शनला विहिरीबाहेर काढून भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून सुदर्शनला मृत घोषित केले. (Jalna Crime News)

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक युवराज पाडळे, पोलीस कर्मचारी समाधान जगताप,
मिलिंद सुरडकर, इंदलसिंग बामनावत आदींनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
सुदर्शन याचे शिक्षण पदवीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत झाले होते. शिक्षणात देखील तो हुशार होता.
वडिलांना आर्थिक आधार व्हावा म्हणून तो शहरातील एका चार्टर्ड अकाऊंटंटकडे कामाला जात होता.
तो आई वडिलांना एकुलता एक असल्याने त्याच्या निधनामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title :- Jalna Crime News | a 20 year old youth drowned in a wel while going to switch on an electri motor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kalyan Crime News | तरुणीला वाचवायला गेलेल्या तरुणांना बॅट-दांडक्यांनी बेदम मारहाण

Old Pension Scheme In Maharashtra | कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन