Jalna Crime News | लेकासोबत जावयाकडे जात असताना ट्रकखाली चिरडून महिलेचा दुर्दैवी अंत

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – Jalna Crime News | जालनामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये घरगुती कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद येथून जालना येथे आलेल्या महिलेला रस्त्यावरील खड्ड्यामुळे जीव गमवावा लागला आहे. उषा योगानंद पवार (वय 66 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या औरंगाबाद येथील रहिवाशी होत्या. तर त्यांचा मुलगा आनंद योगानंद पवार (वय 35 वर्ष, रा.औरंगाबाद) हा या अपघातात (Accident News) गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर स्कुटी फरफटत गेल्याने स्कूटी चालकाचे कपडे सुद्धा फाटले होते. (Jalna Crime News)

काय घडले नेमके?
औरंगाबाद शहरातील एका ठिकाणी आयोजित वास्तुशांतीचा कार्यक्रम आटपून उषा पवार स्कूटीवरुन आपल्या मुलासोबत जावयाच्या घराकडे निघाल्या होत्या. यादरम्यान लक्कडकोट येथील रस्त्यावरील खड्ड्यांमधे स्कूटी आदळून त्या खाली पडल्या. त्यानंतर पाठीमागून येत असलेल्या ट्रकने त्यांना चिरडले आणि यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Jalna Crime News)

या अपघाताची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शव विच्छेदनासाठी सामान्य जिल्हा रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात संतप्त झाले होते. त्यांनी घटनास्थळी जालना पालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेच्या विरोधात आंदोलन केले, सोबतच नागरिकांनी पालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेच्या प्रशासनाविरुद्ध रस्ता रोखून जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title :- Jalna Crime News | jalna lady dies after falling in potholes crush to death by truck while going at daughter home with son

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagpur Crime News | एका शुल्लक कारणावरून पतीने केली पत्नीची हत्या मग स्वतःदेखील केली आत्महत्या; नागपूरमधील घटना

Mumbai Crime News | धक्कादायक ! पनवेलमध्ये लेकीसोबत बापानेच केले दुष्कर्म; मुलीच्या पोटात दुखू लागल्याने झाले उघड

Pune Crime News | मुलींच्या वसतीगृहात जाण्यास मनाई केल्याने टोळक्याने दांडक्याने केली मारहाण

Aurangabad Crime News | नववधूने लग्नाच्या 6 दिवसांनंतर सासरच्या माणसाच्या हातावर तुरी देत केले पलायन; औरंगाबादमधील घटना

Samantha Ruth Prabhu | अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ला समांथा रुथ प्रभूचा नकार; समोर आले खरे कारण