Jalna Crime News | मरणानंतरही साथ सोडली नाही; पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या 5 तासांनी पतीनेदेखील सोडले प्राण

0
443
Jalna Crime News | the husband died five hours after his wifes death in jalna
File Photo

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – Jalna Crime News | जालना जिल्ह्यात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. 75 वर्षांच्या पत्नीचे वृध्दापकाळाने निधन झाल्यानंतर पाच तासानंतर पतीनेदेखील आपले प्राण सोडले आहेत. हि घटना जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील कोपार्डा या ठिकाणी घडली आहे. या दाम्पत्याने एकमेकांची साथ देत 60 वर्ष सुखा समाधानाचा संसार केला. त्यांनी मरणानंतरदेखील एकमेकांची साथ सोडली नाही. दोघांचा मृत्यूदेखील एकाच दिवशी झाला. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या 5 तासांनी पतीने आपला जीव सोडला आहे. (Jalna Crime News)

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पत्नी यशोदाबाई सुपडू ढोले (75) यांचे शुक्रवारी दुपारी वृद्धपकाळाने दुपारी 2 वाजता निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पाच तासाने पती सुपडू ढोले (80) यांचेही निधन झाले. यशोदाबाई यांची वृध्दापकाळातील अल्पशा आजाराने प्रकृती बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेले होते. मात्र त्यांनी अर्ध्या रस्त्यातच आपला जीव सोडला. सुपडु ढोले यांना देखील वयोमानानुसार दम्याचा त्रास होत असल्याने त्यांनादेखील उपचारासाठी रुंग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी सुपडु ढोले यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना घरी आणले. (Jalna Crime News)

 

मात्र आपली पत्नी आपल्याला सोडून गेल्याचे दुःख त्यांना सहन न झाल्याने त्यांनादेखील आपला जीव सोडला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली. या दाम्पत्यावर काल शनिवारी दि. 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अत्यंसंस्कार करण्यात आले. या दाम्पत्याच्या माघारी दोन मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title :  Jalna Crime News | the husband died five hours after his wifes death in jalna

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा