Jalna Crime News | फ्री फायर गेमवरून दोन गटांमध्ये जोरदार राडा; हाणामारीत चाकू अन् खंजीरचा वापर

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – Jalna Crime News | आजकाल लोकांचा कोणत्या कारणावरून इगो दुखावेल सांगता येत नाही. आपला इगो दुखावल्यामुळे लोक काय करतील याचा काही नेम नाही. जालना जिल्ह्यात (Jalna Crime News) अशीच एक घटना घडली आहे. यामध्ये जालना शहरामधील मोती बागेजवळ फ्री फायर गेममध्ये (Free Fire Game) पैसै हरल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या हाणामारीत सुमारे सात तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दोन गटांमध्ये फ्री फायर गेममधे पैसै हरल्याच्या कारणावरून आधीपासूनच वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी एका गटाने दुसऱ्या गटास मोतीबाग या ठिकाणी बोलावले मात्र त्या ठिकाणी वाद मिटवण्याऐवजी अजून वाढला. यानंतर एका गटातील तरुणांनी दुसऱ्या गटातील तरुणांवर अचानक चाकू आणि खंजीरने हल्ला केला. या घटनेमुळे मोतीबाग परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस (Kadim Jalna Police Station) आधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या मध्ये सात तरुण गंभीर जखमी झाले आहेत. यामधील शेख कैफ, शेख तनवीर, शेख मुसाद्दिक, यांच्यावर सामान्य शासकीय रुग्णालयात तर अबुजर, साहिल, शादाब, यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणांच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
त्यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Web Title : Jalna Crime News | two group clashes over free fire game in moti bagh jalna seven injured
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Salman Khan | अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षितेत वाढ