Jalna Crime | धक्कादायक ! जावयानं सासर्‍याला नदीपात्रात नेलं, दोघांच्या मदतीनं सपवलं; प्रचंड खळबळ

जालना : पोलीसनामा ऑनलाइन –  Jalna Crime | घरच्या क्षुल्लक कारणामधुन जावयाने आपल्या सास-याची अमानवीयपणे हत्या (Murder) केली आहे. ही धक्कादायक घटना जालना (Jalna Crime) येथील घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण येथे घडली आहे. जावयाने इतर दोघांच्या सहाय्याने सास-याला नदीपात्रात नेऊन पाण्यात बुडवून हत्या केली आहे. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात (Ghansawangi Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. तर, आरोपी जावयाला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात (Arrested) घेतले आहे. एक आरोपी मात्र फरार आहे.

याबाबत माहिती अशी की, रमेश चिमाजी भारसाखळे (Ramesh Chimaji Bharasakhale) (रा. खांडवी, परतूर) असं हत्या झालेल्या सासऱ्याचं नाव आहे.
तर अरुण काशीनाथ आव्हाड (Arun Kashinath Awhad) असं आरोपी जावयाचं नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणातून जावई आणि सासऱ्यात खटकत होतं.
याच वादातून आरोपी जावयानं आपल्या 2 मित्रांच्या सहाय्याने सास-याला मारण्याचा कट आखला.
9 सप्टेंबर रोजी घरगुती कारणातून वाद झाल्यानंतर आरोपी जावयाने सासऱ्याला बाणा नदीच्या पात्रात घेऊन गेला.
याठिकाणी आरोपीनं आपल्या 2 साथीदारांच्या सहाय्याने सासऱ्याला नदीतील पाण्यात बुचकाळलं. सास-याच्या नाकातोंडात पाणी घुसल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, याबाबत माहिती समजताच पोलिसांनी (Ghansawangi Police Station) घटनास्थळी धाव घेतली. आणि पंचनामा केला होता.
त्यानंतर पोलिसांनी मृताची ओळख पटवण्याचा मृतदेहाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल केला.
ओळख पटल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याची कसून तपासणी करत पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे.
अन्य एकजण फरार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

 

Web Title : Jalna Crime | son in law killed father in law by drowning in bana river water in jalna

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Cabinet Decision | सिम कार्डपासून टॉवर उभारण्यापर्यंतचे नियम बदलणार, टेलीकॉम कंपन्यांसाठी मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यात 10 % व्याज आणि मित्राकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून युवकाची आत्महत्या, ‘दोस्त’ आला गोत्यात

Shripad Chhindam Arrest | शिवरायांचा अवमान करणार्‍या श्रीपाद छिंदमला भावासह अटक, जाणून घ्या प्रकरण