Jalna Crime | मुलानेच दिली जन्मदात्या वडिलांच्या खूनाची सुपारी, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – दारुड्या मुलाने चक्क आपल्या जन्मदात्या वडिलांचा सुपारी देऊन खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात (Jalna Crime) घडली आहे. जमीन (Land) विकण्यास विरोध केल्याच्या रागातून दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध वडिलांचा निर्घृण केला. धक्कादायक म्हणजे वडिलांचा खून करण्यासाठी त्याने आपल्या जवळच्याच नातेवाईकाला सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील (Jalna Crime) पुणेगाव (Punegaon) येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

 

जालना जिल्ह्यातील (Jalna Crime) पुणेगाव येथील भाऊसाहेब चव्हाण (Bhausaheb Chavan) हे नेहमीप्रमाणे बुधवारी (दि.5) शेतात झोपायला गेले होते. त्यावेळी काही जणांनी त्यांच्यावर चाकूने व लाकडाच्या काठीने वार केले. या हल्ल्यात चव्हाण गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात (Jalna Taluka Police Station) अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) तापस करुन अवघ्या दोन दिवसांत आरोपींना अटक केली. (Jalna Crime)

 

मयत चव्हाण यांचा मोठा मुलगा अरविंद चव्हाण (Arvind Chavan) याने गावातीलच साथीदार नातेवाईक अनिल अर्जुन अंभोरे Anil Arjun Ambhore (वय-22), संतीष अर्जुन अंभोरे Santosh Arjun Ambhore (वय-25) यांच्या मदतीने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयावरुन अरविंदला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

वडिलोपार्जित शेती विकून आरोपीला पैसे पाहिजे होते. वडिलांचा शेती विकण्यास विरोध होता.
ते त्याला शेताची विक्री करु देत नव्हते. तसेच वडिलांनी नुकतीच बैलजोडीची विक्री केली होती.
त्यातून आलेले पैसे देखील त्यांनी दिले नाहीत. याचा राग आल्याने अरविंद याने वडिलांना कायमचं संपवण्याची सुपारी आपल्या जवळील नातेवाईकांना दिली.
सर्व गाव झोपेत असताना मयताचा मुलगा व नातेवाईक शेतात गेले.
त्याठिकाणी झोपलेल्या भाऊसाहेब यांचे तोंड दाबून त्यांच्यावर चाकूने सपासप वार करुन डोक्यात लाकडी दांड्याने वार केले.

 

 

Web Title :- Jalna Crime | son killed his father for not giving money in jalna district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Corona Third Wave | राज्यात ‘कोविड’चा पीक टाईम कधी, कोरोनाची तिसरी लाट कधी ओसरणार?

 

Pune News | पोलीस अधिकाऱ्याची थेट 234 किलोमीटर सायकल स्वारी; फिटनेसबाबत संदेश देत ‘देहू ते पंढरपूर’ वारी

 

PM kisan | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता तुम्हाला दरवर्षी 6000 बरोबर 36000 रुपये मिळतील, तात्काळ करा ‘हे’ काम