Jalna Crime | पावसामुळे ओला दुष्काळ ! मराठा आरक्षण नसल्याने नोकरी नाही, हवालदिल तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

जालना : पोलीसनामा ऑनलाइन  मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार (Heavy rain) हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे हताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच मराठा आरक्षणावर (Maratha reservation) तोडगा निघत नसल्याने तरुणांना नोकरी मिळत नाही. यामुळे मराठा तरुणांच्या पदरी निराशा आली आहे. याच नैराश्येतून जालना जिल्ह्यातील (Jalna Crime) एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. जालना जिल्ह्यातील (Jalna Crime) परतूर तालुक्यातील आष्टी येथील एका तरुणाने गळफास (Young man suicide) घेऊन आत्महत्या केली आहे.

सदाशिव शिवाजी भुंबर Sadashiv Shivaji Bhumbar (वय-22 रा. येणोरा, ता. परतूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मुसळधार पावसामुळे गावात ओला दुष्काळ असल्याने शेतीचे मोठे नुकसान झालं आणि मराठा आरक्षण मिळत नसल्याने नोकरी (job) मिळत नाही.
अशा दुहेरी संकटात सापडलेल्या हवालदिल सदाशिव याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदाशिव याने इलेक्ट्रिीशनचा कोर्स (Electrification Course) केला होता. मागील काही दिवसांपासून तो पुण्यातील (Pune) एका खासगी कंपनीत नोकरी करत होता.
परंतु मराठा समाजाला आरक्षण नसल्याने चांगले शिक्षण घेऊनही त्याला नोकरी मिळत नव्हती.
त्यामुळे तो 20-25 दिवसांपूर्वी आपल्या गावी आला होता.
घरी चार एक शेती होती मात्र पावसामुळे ओला दुष्काळाचा सामना करावा लागत होता.

 

मुसळधार पडलेल्या पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतातील पिकंही करपून गेली होती. एकीकडे नोकरी नाही आणि दुसरीकडे शेतीचं नुकसान झाल्याने सदाशिव आर्थिक विवंचनेत सापडला होता. यामुळे हवालदिल झालेल्या सदाशिवने आपल्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
यामध्ये त्याने आत्महत्येचा कारणांचा खुलासा केला आहे. पुढील तपास पोलीस (Police) करीत आहेत.

 

Web Title : Jalna Crime | young man commits suicide in jalna after become jobless maratha reservation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter</ a> for every update

Covid 19 Drugs | नव्या औषधानं फक्त 5 दिवसात कोरोना रुग्ण होणार ठणठणीत – सीडीआरआयचा दावा

UP Election | काँग्रेसचा नवा फॉर्म्युला ! तिकिट हवं असेल तर 11 हजार रुपये अन् ‘या’ 7 प्रश्नांची द्या उत्तरं

OLA Electric Scooter New Price | ओलाच्या ‘ई-स्कुटर’च्या किमतीत कपात; ऑक्टोबरपासून रस्त्यावर धावणार