Jalna Police News | खळबळजनक ! सुसाईड नोट WhatsApp करुन पोलीस कर्मचारी बेपत्ता, अधिकाऱ्यांना धरले जबाबदार

जालना : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Jalna Police News | जालना जिल्ह्यातील एक पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता (Police Personnel Missing) झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने सुसाईड नोट (Suicide Note) व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) वर पोस्ट केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर सुसाईड नोट पोस्ट केल्यानंतर कर्मचाऱ्याने आपला मोबाईल बंद केला आहे. सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. या प्रकारामुळे जालना पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील (Jalna District) सेवली पोलीस ठाण्यांतर्गत (Sevli Police Station) असलेल्या उखळी गावात गावठी दारुच्या अड्यावर कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरुन करण्यात आल्याची माहिती आरोपीला दिली होती. त्यामुळे आरोपी आणि त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन या कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून शिवीगाळ करत धमकी दिली.

या प्रकारानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने हे पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे. सुसाईड नोटमध्ये आपण प्रभारी अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करित असल्याचे म्हटले आहे. ही सुसाईड नोट कर्मचाऱ्याने पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर केली. त्यानंतर दुपारी मोबाईल बंद केला आणि तेव्हापासून तो बेपत्ता झाला आहे. आपल्या मरणास संबंधित प्रभारी अधिकारी, आरोपी पती-पत्नी जबाबदार राहणार असून, याची सर्व माहिती माझ्या पत्नीला द्यावी, असे चिठ्ठीत नमूद केले आहे.

Web Title :- Jalna Police News | police personnel missing after posting suicide note on whatsapp his mobile also switch off

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

Pune News | शेरेबाजी करण्यापेक्षा पाटील यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत – माजी आमदार मोहन जोशी

फायद्याची गोष्ट ! मुलांसाठी ‘या’ बँकेनं ने सुरू केली विशेष सुविधा, राहणार नाही भविष्याची चिंता; होईल मोठा फायदा

Nitesh Rane | व्यासपीठावरील शिवसेना नेत्यासमोर नितेश राणेंचे युतीबद्दल वक्तव्य