अनैतिक संबंधातून ‘ब्लॅकमेलिंग’, पोलिसाची विषारी औषध पिऊन आत्महत्या

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे एका पोलीस कर्मचाऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना जालना येथे घडली असून विष्णू रामराव गाडेकर (वय -35 रा. गवासणी ता. जाफराबाद) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. विष्णू गाडेकर यांनी थायमेंट हे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. अनैतिक संबंधातून महिला पोलीस कर्मचारी गाडेकर यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू गाडेकर हे बुलढाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. सध्या ते देऊळराजा येथे वास्तव्यास होते. महिला पोलीस कर्मचारीने अनैतिक संबंधामुळे गाडेकर यांच्याकडे लग्नाची मागणी केली. महिला पोलीस कर्मचारीने वारंवार लग्नाची मागणी करून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. गाडेकर यांनी लग्नाला नकार दिला. त्यांचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे. त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिल्याने महिलेने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

महिला पोलीस कर्मचारीने विष्णू गाडेकर यांच्याकडे नेहमी पैशांची आणि दागिन्यांची मागणी करत होती. तसेच पैसे आणि दागिने दिले नाहीतर मुलीला जिवे मारून टाकण्याची धमकी गाडेकर यांना दिली होती. तिच्या सततच्या जाचाला कंटाळून गाडेकर यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप गाडेकर यांच्या पत्नीने केला आहेत. पत्नीच्या तक्रारीवरून जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.