व्हेंटिलेटर सुरु नसल्याने भाजपा आमदाराचा संताप; म्हणाले – ‘आता फक्त आत्महत्या करणे बाकी आहे’

राजस्थान /जालोर : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. याचा सर्व ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य सेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. याप्रमाणे राजस्थानमधील जालोर जिल्ह्यामध्ये दैनंदिन बाधितांची संख्या वाढती आहे. येथील कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. प्रशासनाच्या कारभारावरून जालोरचे भाजपचे आमदार जोगेश्वर गर्ग यांनी संतापजनक एक ट्विट करत एक भाष्य केलं आहे.

जालोर: अस्पताल में वेंटिलेटर शुरू नहीं होने से खफा BJP MLA जोगेश्वर गर्ग बोले- आत्मदाह करना बाकी रह गया है Rajasthan News-Jalore News-BJP MLA Jogeshwar Garg angry over not strat ventilator in hospital-Said - Suicide remains to be done

आमदार गर्ग म्हणाले, कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत असून सुद्धा येथील आरोग्य प्रशासन गंभीर नाही. जालोर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रूग्णालयात व्हेंटिलेटरअसून देखील ते चालू केले जात नाही, आता फक्त आत्महत्या करणे बाकी आहे. अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर माझ्या सर्व ताकदीने आणि समजुतीपणाने काम करून थकलो. परिणाम शून्य. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभे राहून आत्मदहन करणे बाकी राहिले आहे. जर तुम्ही म्हणाला, तर हे व्हेंटिलेटर सुरू केले जातील याची हमी दिल्यास आत्महत्या सुद्धा करेन, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे की, सध्या कर्मचारी नसल्याने हे व्हेंटिलेटर चालू करता येत नाहीत. कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत असून लवकरच हे व्हेंटिलेटर सुरू केले जाईल. असे आमदार गर्ग यांनी त्याच्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

या दरम्यान राजस्थानातील जालोर जिल्ह्यामध्ये मागील ३ आठवड्यात कोरोना विषाणूने १७५ जणांनी प्राण गमावला आहे. वैद्यकीय विभाग आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा परिणाम म्हणजे कोरोनाच्या गंभीर स्थितीत सुद्धा जिल्हा रुग्णालयात पडून असलेल्या २३ व्हेंटिलेटरपैकी एक देखील चालू होऊ शकलं नाही. जिल्हा रुग्णालयात काही व्हेंटिलेटर पॅकिंगमध्ये आहेत तर काही वॉर्डामध्ये बंद आहेत. याचप्रमाणे काही ICU वॉर्डामध्ये ठेवले आहेत.