कलयुग ! 17 वर्षीय मुलीस साखळदंडात बांधून बाप वारंवार करत होता ‘बलात्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबाद आणि रांची नंतर आता राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 17 वर्षीय मुलीने आपल्याच पित्याने अत्याचार केल्याबाबत तक्रार केली आहे. अल्पवयीन मुलीने पित्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले होते म्हणून पित्याने मुलीला साखळदंडांनी बांधत तिच्यावर वारंवार बलात्कार केला अशा प्रकारची तक्रार मुलीने दाखल केली आहे.

मुलीने आरोप केले आहेत की, तिने वडिलांना दुसऱ्या महिलेसोबत पकडले होते म्हणून त्यांनी मुलीला एका खोलीत डांबून ठेवले. मुलीने कोणालाही काही सांगू नये म्हणून तिला साखळदंडांनी बांधून ठेवत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. कशीबशी मुलगी तेथून निसटून आपल्या मामाच्या घरी पोहचली. यावेळी मामाला घडलेली सगळी हकीगत सांगितल्यानंतर तात्काळ त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

मुलीच्या मामाने दाखल केली तक्रार
जालोर मधील बागोडा येथिल हा प्रकार असून गिरधर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी मुलीच्या मामाने तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले आहे. यानुसार त्यांच्या बहिणीचा विवाह आरोपीशी झाला होता. परंतु तो तिला मारहाण करत होता त्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये भांडण निर्माण झाले आणि आरोपीने अखेर दुसरे लग्न केले.

आरोपीच्या परिवारातील महिलेशीच आहेत अनैतिक संबंध
पीडितेच्या मामाने पोलिसांना सांगितले की, त्यांची भाची आपल्या वडिलांकडेच राहत होती. आरोपीचे परिवारातील महिलेसोबतच संबंध होते. पीडितेने एकदा तिच्या वडिलांना त्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पाहिले. आपल्या संबंधांचे भांडे फुटू नये म्हणून महिलेने आणि पित्याने मुलीला साखळदंडाने बांधून खोलीत डांबले. काही दिवसानंतर कशीतरी मुलगी वडिलांच्या तावडीतून पळून आली.

वडिलांनी अनेकदा केला बलात्कार
29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी मुलगी कशीबशी मामाच्या घरी पोहचली. जेव्हा मुलगी मामाकडे पोहचली तेव्हा तिच्या पायात बेड्या होत्या ज्याला तीन कुलूप लावलेले होते. पीडितेने आपल्या मामला सांगितले की आरोपी वडील तीला स्वतः सोबतच झोपवत असे आणि अनेकदा तिचा बलात्कार देखील केला. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अ‍ॅक्ट सोबत अनेक कलमांनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. याबाबतचा अधिक तपासणी पोलीस उपनिरीक्षक एससी-एसटी सेल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Visit : policenama.com