Jalyukt Shivar | ‘जलयुक्त शिवार योजना ही झोलयुक्त शिवार योजनाच होती’

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  तत्कालीन मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar) योजनेत भ्रष्टाचार झाल्यावर ‘कॅग’पाठोपाठ राज्य सरकारच्या चौकशी समितीनंही शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळं आता ‘झोलयुक्त’ योजनेतील भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे,’ अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसनं केली आहे. सरकारच्या जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar) योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस पक्ष करत आहेच. यातच आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी देखील यावर अनेक जोरदार ताशेरे ओढले आहेत.

‘महाविकास आघाडी सरकारने’ (Mahavikas Aghadi government) एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने सरकारला रिपोर्ट सादर केला आहे.
यामधून 900 कामांची लाचलुचपत विभागाद्वारे (ACB) व 100 कामांची विभागीय चौकशीची शिफारस केली आहे.
यातून कॅगपाठोपाठ सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीने ही जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब केला असून या झोलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत गेले पाहिजे, असं सावंत म्हणाले.

‘या सर्व उद्दिष्टांवर ही योजना सपशेल अपयशी ठरली..

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी सांगितलं आहे की, ‘जलयुक्त शिवार योजनेचे उद्दिष्ट्य पावसाचे पाणी गावच्या शिवारात अडवणे, भूभर्गातील पाण्याच्या पातळीत व सिंचन क्षेत्रात वाढ करणे तसेच पाणी वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे असे होते.
या सर्व उद्दिष्टांवर ही योजना सपशेल अपयशी ठरली आहे.
काँग्रेसने 2015 पासूनच ही योजना भ्रष्टाचारग्रस्त आणि भाजपाच्या (BJP) बगलबच्चे व कंत्राटदारांसाठी कुरण बनल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या योजनेबाबत करण्यात आलेले सर्व दावे फडणवीस सरकार असतानाच पोकळ निघाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 हजार गावे या योजनेमुळे दुष्काळमुक्त झाली आणि अजून 9 हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत.
तसेच, आठच दिवसांत ही सर्व तथाकथित दुष्काळमुक्त गावे तत्कालीन सरकारला दुष्काळयुक्त म्हणून जाहीर करावी लागली होती.”

मी लाभार्थी’ या खोट्या जाहिरातींवर शेकडो कोटी रूपयांची उधळण..

पुढे बोलताना सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणाले, ‘जलयुक्त योजनेवर जवाजवळ दहा हजार कोटी रुपये खर्च करूनही 2019 च्या मे महिन्यात राज्यात 7 हजारांपेक्षा अधिक टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता.
तर राज्यात 2018 च्या ‘भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या’
रिपोर्टनुसार 252 तालुक्यांत 13.984 गावांत 1 मीटर पेक्षा जास्त भूजल पातळी खाली गेली होती.
आणि प्रत्यक्ष राज्यात त्याच रिपोर्टनुसार एकूण 31.015 गावांत पाण्याची पातळी खोल गेली होती.
असं असताना देखील देवेंद्र फडणवीस सरकार जवळच्या ठेकेदारांना जगवण्यासाठी
या योजनेचे गुणगान करत राहिले.
तसेच, आघाडी सरकारने या भ्रष्टाचारी योजनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आता सरकारला प्राप्त झाला असून लवकरच भाजपाच्या भ्रष्टाचारी बगलबच्चे व दोषी कंत्राटदारांना
शिक्षा होईल, असं सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी म्हटलं आहे.

Web Title : Jalyukt Shivar | Jalyukt Shivar yojana was a jholyukta shivar yojana criticism of sachin sawant

Khadakwasla Dam | खडकवासला धरणातून विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Swapnil Lonkar Suicide | स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांचं 20 लाखांचं कर्ज भाजपानं फेडलं, फडणवीसांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

Indian Army Officer 2021 | भारतीय सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी ! अधिकारी पदासाठी भरती सुरु; आजच करा अर्ज