IN PICS : टीव्ही अभिनेत्री सारा अरफान खाननं दिला ‘गोंडस’ जुळ्या बाळांना जन्म !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री सारा अरफान खान प्रेग्नेंसीमुळे खूप चर्चेमध्ये आली होती. साराने बेबी बंपचे काही फोटो सोशल मिडियावरल शेअर करुन चाहत्यांचे मन जिंकले होते. तिने प्रेग्नेंसी दरम्यान खूपच सुंदर फोटोशूट केले होते. नुकतेच या अभिनेत्रीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.

सीरियल जमाई राजा फेम अभिनेत्री साराने नुकतेच जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी साराने सोशल मिडियावर आपल्याला चाहत्यांसाठी स्वतः शेअर केली आहे. साराने सीजेरियन डिलीवरीद्वारे आपल्या जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.

जुळ्या बाळांसोबत साराने एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये साराने आपल्या दोन्ही बाळांना घेतलेली दिसत आहे. साराने प्रेग्नेंसीचे दिवस खूप एन्जॉय केले आणि याच दरम्यान तिने सुंदर फोटोशूट देखील केले.

प्रेग्नेंसीच्या दिवसात साराने योगा करुन आपल्याला फिट ठेवले आणि तिची योगा ट्रेनर म्हणजे साराची आई यांनी देखील बाळांचा पहिला फोटो शेअर केला आहे.
साराने आपल्या एका बाळाचे नाव इजाह आणि दुसऱ्या बाळाचे नाव जीदेन ठेवले आहे. जेनने सारा आणि तिच्या जुळ्या बाळांचा फोटो शेअर करुन लिहले की, माझ्या लाडकी विद्यार्थी साराला खूप शुभेच्छा.

साराने २००९ मध्ये अरफीन खानसोबत लग्न केले होते. बाळाच्या जन्मानंतर साराला तिचे चाहते खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे.

 

आरोग्यविषय वृत्त –