‘जेम्स बॉन्ड गर्ल’ आणि ‘द अ‍ॅव्हेंजर्स’ची अ‍ॅक्ट्रेस ‘ऑनर ब्लॅकमॅन;चं निधन !

पोलीसनामा ऑनलाईन :जेम्स बॉन्ड सिनेमात काम केलेली अभिनेत्री ऑनर ब्लॅकमॅन हिचं निधन झालं आहे. द गार्जियननं तिच्या निधनाच्या बामतीची पुष्टी कर जेम्स बाँड गर्लचं निदन झाल्यांच सांगितलं आहे. जेम्स बॉन्डची सीरिज गोल्डफिंगर या सिनेमात तिनं काम करून खूप अटेंशन घेतलं होते. सध्या अनेक कलाकार कोरोनामुळं जीव गमावत आहे. ऑनरचा मृत्यूशी कोरोनाचा संबंध नसल्याचं सांगिलतं जात आहे.

ऑनरच्या निधनानंतर तिच्या कुटुंबातील एकानं सांगितलं की, “ती एक चांगली अभिनेत्री तर होती पंरतु कुटुंबातील जबाबदाऱ्याही ती चांगल्या पद्धतीनं निभवत होती. ती एक चांगली आणि आजीही होती. तिच्या आवाजात जणू जादू होती. आम्ही तिला कधीच विसरू शकणार नाहीत. ती नेहमीच आमच्यामध्ये जिवंत राहणार आहे.” ऑनरच्या कुटुंबाला त्यांच्या जाण्यानं खूप दु:ख झालं आहे.

ऑनरच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर आता चाहतेही निराश झाले आहेत. या अभिनेत्रीला भारतातही मोठी पसंती होती. समोर आलेल्या माहितीनुसार ऑनरनं 94 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. तिनं अ‍ॅव्हेंजर्स या टीव्ही शोमधूनही खूप अटेंशन घेतलं आहे. तिच्या निधानानं इंडस्ट्रीतील लोक शोक व्यक्त करताना दिसत आहेत.

ऑनर ब्लॅकमॅन हिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत तिची एक वेगळी जागा तयार केली होती. चाहत्यांसोबतच अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला श्रद्धांजली देताना दिसत आहेत.

You might also like