Coronavirus : ‘जेम्स बॉन्ड’मधील अ‍ॅक्ट्रेस ओल्गा कुरीलेंको ‘कोरोना’ ची ‘शिकार’, झाली आता घरात बंद !

 पोलीसनामा ऑनलाईन टीम – युक्रेन वंशाची मॉडेल आणि जेम्स बॉन्ड सिनेमाची अ‍ॅक्ट्रेस ओल्गा कुरीलेंको (Olga Kurylenko) ही देखील कोरोनाग्रस्त झाली आहे. ओल्गानं सोशल मीडियावरून माहिती दिली आहे की, तिची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ओल्गा कुरीलेंको म्हणाली, “कोरोना व्हायरसची माझी टेस्ट पॉझिटीव आल्यामुळं मी माझ्या घरातच आहे. मी गेल्या एक आठवड्यापासून आजारी आहे. या आजाराचं प्रमुख लक्षण ताप आणि थकवा आहे. आपली काळजी. हा विषय गंभीरतेनं घ्या.” ओल्गानं या पोस्ट सोबतच एक फोटोही शेअर केला आहे. फोटोत तिच्या घराची बालकनीदेखील दिसत आहे.

ओल्गाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं 2008 साली आलेल्या जेम्स बॉन्ड सिनेमा द क्वांटम ऑफ सोलेस मध्ये काम केलं आहे. याशिवाय 2013 साली आलेल्या सायन्स फिक्शन सिनेमा ओब्लिवियन मध्येही तिनं काम केलं आहे.

या जागतिक महामारीनं ग्रस्त असणारी ओल्गा कुरीलेंको ही एंटरटेंमेंट इडस्ट्रीतील नववी सेलेब आहे. याआधीही फॉरेस्ट गंप स्टार टॉम हॅक्स आणि त्यांची पत्नी रीता विल्सन कोरोनाचे शिकार झाले आहेत.