James Bond च्या ‘या’ सिनेमाच्या टीजरचा सोशलवर ‘धुमाकूळ’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड सुपरस्टार डॅनियल क्रेग (Daniel Craig) म्हणजेच जेम्स बाँड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या याचे कारण म्हणजे त्याचा आगामी सिनेमा नोट टाईम टू डाय आहे. जेव्हापासून क्रेगच्या या बहुचर्चित सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे तेव्हापासून सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 30 सेकंदाच्या या टीजरमध्ये क्रेग अनेक खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. जगभरात क्रेगचे चाहते आहेत. या सिनेमात त्याच्यासोबत रामी मालेक, राल्फ फिन्स, ली सेडॉक्स, एना डी अरमास आणि लशाना लिंच असे कलाकार दिसणार आहेत.

गेल्या शनिवारी जेम्स बाँडनं आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवरून सिनेमाचा टीजर रिलीज केला आहे. हा टीजर प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 2 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना खूप काही नवीन पहायला मिळणार आहे.

एका रिपोर्टनुसार असं सांगितलं जात आहे की क्रेग या सिनेमात त्याच्या लुकसोबत एक्सपेरीमेंट करताना दिसणार आहे. या मेगास्टारनं गेल्या चार सिनेमांमध्ये गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. परंतु यावेळी मात्र क्रेगच्या चाहत्यांना त्याच्या भूमिकेत बदल दिसण्याची शक्यता आहे. हा सिनेमा याच वर्षी एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे.

You might also like