जामिया वाद : प्रियंका गांधींचे इंडिया गेटसमोर धरणे आंदोलन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जामिया मिलिया इस्मालिया विद्यापीठ आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा वाद आता चिघळू लागला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडिया गेटसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्यासोबत अन्य काँग्रेस नेते असून आज सायंकाळी सहावाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.

यावेळी प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, सरकारने संविधान आणि विद्यार्थी यांच्यावर हल्ला केला आहे. पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला. आम्ही संविधानासाठी लढू, आम्ही या सरकारविरोधात लढू.

कांग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी या धरणे आंदोलनाची माहिती देताना सांगितले की, मोदी सरकार देशातील युवक आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करत आहे. यासाठी प्रियंका गांधी वाड्रा अन्य काँग्रेस नेत्यांसोबत इंडिया गेटवर सायंकाळी चारपासून दोन तासासाठी धरणे आंदोलन करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/