जामिया युनिव्हर्सिटीची वेबसाइट हॅक; प्रियकराकडून हैप्पी बर्थडे गिफ्ट

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

मध्यन्तरी रॅनसमवेअर सारख्या व्हायरस ने सर्वांना चिंतेत पाडले होते. आता जामिया युनिव्हर्सिटीची वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. मिया मिल्लिया इस्लामियाची अधिकृत वेबसाइट www.jmi.ac.in रात्री 12 वाजता हॅक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हॅकर्सने वेबसाईटच्या पूर्ण स्क्रीन ला काळे केले असून यावर त्यावर हॅपी बर्थडे पूजा असा संदेश लिहिला आहे.तसेच स्क्रीनच्या खाली लाल रंगाच्या छोट्या अक्षरात ‘Your LOVE’ असेही शब्द लिहिलेले पाहायला मिळतायत. परंतु साईट हॅकर चा अद्याप पत्ता लागला नाही.सोशल मीडियावर ही बातमी वा-यासारखी पसरली आहे. याची चर्चा मात्र सर्वत्र होताना दिसते आहे.

वेबसाईटच्या खालच्या बाजूला सफेद रंगात T3AM लिहिल्याचे दिसत आहे. आता पूर्ण जामियाला समजलं असेल की, 22 मे रोजी पूजाचा जन्मदिवस आहे, अशी प्रतिक्रिया एका सोशल नेटवर्क युझरने दिली आहे. कोणत्या तरी टेक्नोसेव्ही चाहत्याने वेबसाइट हॅक केल्याचेही दुसरा एक युझर म्हणाला आहे. परंतु जामिया युनिव्हर्सिटीची वेबसाइट कोणी हॅक केली आहे, याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.

यापूर्वीही, सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली होती. त्यावेळी ब्राझीलच्या हॅकर्सवर शंका उपस्थित केली गेली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण वेबसाइटवर “hackeado por HighTech Brazil HackTeam” लिहिलेलं होतं. तसेच गेल्या वर्षी केंद्रीय गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि कायदा आणि कामगार मंत्रालयाचीही वेबसाइटही हॅक करण्यात आली होती.