‘जामिया’ जळंत होतं, तिकडं पोलिस आयुक्त ‘फोटो-शूट’मध्ये मग्न होते

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि दक्षिण-पूर्व जिल्ह्यातील जामिया येथे रविवारी जेव्हा सरकारी बसेस आणि खाजगी वाहना जाळल्या जात होत्या, निर्दोष लोकांवर दगडफेक होत होती, त्यावेळी पोलिस आयुक्त अमुल्य पटनायक द्वारका-जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये दोन-तीन कार्यक्रमांमध्ये हजेरी लावून घटनास्थळी पोहोचले होते. ते दोन अडीच तास त्याच परिसरात होते. सीपी (पोलिस आयुक्त) पब्लिकलाही भेटले होते !’

दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त प्रवक्ते आणि एसीपी अनिल मित्तल यांनी मंगळवारी सांगितले कि, “जेव्हा सी.पी. कार्यक्रमात उपस्थित होते तेव्हा जामियामध्ये हिंसा सुरू झाली नव्हती. जेव्हा सीपी द्वारका भागातील एका कार्यक्रमात आले, तेव्हा जामियामध्ये हिंसेच्या घटना अमोर आल्या. त्यानंतर सी.पी. घटनास्थळी रवाना झाले. तेथे ते सामान्य नागरिकांशी भेटले आणि बिघडलेले वातावरण नियंत्रण ठेवण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.”

जेव्हा अतिरिक्त पीआरओला विचारले की, पोलीस आयुक्तांनी कोणत्या भागाला भेट दिली आणि कोणकोणत्या जबाबदार लोकांना भेटले ? यावर ते म्हणाले कि, “फक्त क्षेत्र लिहा. क्षेत्राच्या नावाचे काय करायचे आहे. “दिल्ली पोलिसांच्या अतिरिक्त प्रवक्त्यानेही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे नाकारली. ते म्हणाले, “फक्त ते लिहा, सीपी साहिब बाधित भागात जाऊन सर्वांना भेटले.”

मात्र, यावर प्रश्न उपिस्थत होतो कि, पोलिस आयुक्त जामिया नगर आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसर आणि त्याच्या आसपासच्या भागात पोहोचल्यास तेथे उपस्थित असलेल्या सर्व माध्यमांमध्ये त्याचा व्हिडिओ किंवा फोटो असायला हवा ? मात्र दिल्ली पोलिसांच्या अतिरिक्त प्रवक्त्यांकडे या प्रश्नावरही उत्तर नव्हते.

उल्लेखनीय आहे की, सोमवारी जम्मिया परिसरातील हिंसेच्यावेळी द्वारका परिसरातील कम्युनिटी पोलिस वाहन सेवेचे उद्घाटन दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनाईक यांनी केले होते. द्वारका भागातच त्यांनी रविवारी सायंकाळी सामुदायिक सेवा केंद्राचे उद्घाटनही केले होते, त्यांचे फोटो वैराळी झाले होते.

त्यामुळे जेव्हा दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक घटनास्थळी गेले, तेव्हा त्यांनी माध्यमांच्या गर्दीतील वक्तव्य कसे आणि का चुकवले ? पोलिस आयुक्त आधीच नियोजितप्रमाणे द्वारकाच्या कार्यक्रमात रिबन कापून जामिया भागात पोहोचले आहेत, तरीही ते वेळेवर पोचले..? हे कसे शक्य झाले असते ? असे प्रश्न मात्र उपस्थित झाले आहेत.

जर पोलिस आयुक्त घटनास्थळी गेले तर दिल्ली पोलिस प्रवक्ते मनदीपसिंग रंधावा यांना दुसर्‍या दिवशी म्हणजेच सोमवारी घटनेच्या २४ तासांनी दिल्ली पोलिस मुख्यालयात मीडियाला भेटण्यासाठी मोकळा वेळ कसा मिळाला? घटनेच्या निमित्ताने पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी माध्यमांना का सांगितले नाही ?

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/