‘जमीयत उलेमा – ए -हिंद’ने केले स्पष्ट, ‘काश्मीर’ भारताचा ‘अविभाज्य’ भाग

नवी दिल्ली :  वृत्तंसस्था – काश्मीर भारताचाच अविभाज्य भाग असल्याचे जमीयत उलेमा – ए – हिंदने म्हणले आहे. दिल्लीत झालेल्या उलेमा – ए – हिंदने एक प्रस्ताव पास केला. त्यात ते म्हणाले की, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि सर्व काश्मीरी आमचे भाऊबंध आहेत. कोणत्याही फुटीरतावाद्यांचे आंदोलन ने की फक्त देशासाठई तर काश्मीरसाठी देखील धोकादायक आहे.

ते म्हणाले की, आम्हाला वाटते की काश्मीरी लोकांच्या लोकशाहीची आणि मानवाधिकाराची रक्षा करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्यामुळे आम्हाला वाटते की त्यांची सुख भारताबरोबर असणे हे आहे. विरोधी शक्ती आणि शेजारील देश काश्मीरला नष्ट करण्याचा विचारात आहेत.

जमीयत उलेमा – ए – हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी शुक्रवारी RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनीच भेट घेतली, ही भेट दिल्लीत केशव कुंज वर झाली.

दोघांच्या भेटीत झाली ही चर्चा –
दोघांची चर्चा जवळपास 1 तासाहून अधिक वेळ सुरु होती, दोघांच्या भेटीची भूमिका अनेक दिवसांपासून सुरु होती यासाठी भाजपचे माजी संघटक महासचिव राम लाल यांनी अनेक प्रयत्न केले.
दोघांनी मॉब लिंचिगमधून होणाऱ्या हत्या, घडणारे अपराध रोखण्याच्या चर्चेवर भर दिला. यात NRC आणि इतर काही मुद्यावर चर्चा करण्यात आली.

Loading...
You might also like