धक्कादायक ! ‘जामिया’ मारहाण प्रकरणी सर्वात खळबळजनक Video ‘व्हायरल’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ तेथील आंदोलनामुळे चर्चेत होते. CAA आणि NRC विरोधात तेथे आंदोलन चालू असताना देशभर त्याचे पडसाद उमटले होते. या आंदोलनाला हिंसक वळण येऊन बस जाळण्याचे प्रकार, तोडफोड, तसेच विद्यार्थ्यांवर लाठीमारही झाला होता. त्यामुळे देशभर याची चर्चा होती. त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यादरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांच्या मारहाणीचा एका व्हिडिओ व्हायरल झाला असताना आता आणखी एक व्हिडिओ समोर आल्याचे म्हटले जात आहे.

हा व्हिडिओ विद्यापीठातील अभ्यासिकेतला असून सर्व विद्यार्थी तेथे शांतपणे अभ्यास करत असल्याचे दिसत आहे. मग अचानक तेथे जवान येतात आणि विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसतात. तर विद्यार्थ्यांनी पोलिसांनी त्यांना निर्दयीपणे मारहाण केले असल्याचा आरोप केला होता. पण आता एका नवीनच व्हिडिओ समोर आला असून त्यामुळे परत वाद निर्माण होऊ शकतो.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात १५ डिसेंबरला नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून आंदोलन झाले असताना त्यावेळी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या होत्या. तसेच त्याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी जाहीर केले होते. यात एक आंदोलक दुचाकीला आग लावत बस पेटवून देण्यासाठी आग लावलेल्या दुचाकीला बसखाली ढकलून देतो.

दरम्यान या हिंसाचारातील तीन सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले असून पहिल्या व्हिडिओमध्ये काही जण एका बाईकला आग लावत आहेत. दुसऱ्यामध्ये काही आंदोलक आग लावण्यासाठी बाइकमधून पेट्रोल काढत आहेत. तर तिसऱ्यात बसला जाळत असताना दिसत आहेत. हा व्हिडिओ १५ डिसेंबरचा असून आंदोलनादरम्यान हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवणे शक्य होईल, असे पोलिसांनी म्हटले होते.

हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांनी सरकारवर निशाणा साधत पोलीस क्रूरपणे मारत असताना आतातरी कारवाई करावी आणि कारवाई केली नाही तर सरकारचा हेतू चांगला नव्हता हे सिद्ध होते, असे म्हटले आहे.