दहशतवाद्यांकडून पोलिसाचे अपहरण

जम्मू : वृत्तसंस्था
काश्मीरमध्ये शुक्रवारी रात्री त्राल येथून एका पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मुदासीर अहमद असे अपहरण झालेल्या पोलिसाचे नाव असून, ते अवंतीपुराच्या राशीपुरा येथे कर्तव्यावर होते. अहमद यांच्या कुटुंबीयांनीही ते रात्रीपासून गायब असल्याचं सांगितले आहे. मात्र भारतीय लष्कराने त्याला अद्याप दुजोरा दिला नसून अहमद यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
 [amazon_link asins=’B077J5D76C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1a8b80b6-9257-11e8-be19-b91be75b6612′]
सर्वात गंभीर बाब म्हणजे मागील दोन महिन्यातील अशा प्रकारची ही चाैथी घटना आहे. या अगोदर दहशदवाद्यांनी पोलीस हेड  कॉन्स्टेबल सलीम शहा यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तर ६ जुलै रोजी दहशतवाद्यांनी पोलिस शिपाई जावेद अहमद डार यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. तसेच, शिपाई औरंगजेबाचे अपहरण करुन हत्या केल्याची घटना ताजीच आहे.