Jammu and Kashmir | दहशतवाद्यांविरोधातील सर्च ऑपरेशनमध्ये जवान कृष्ण वैद्य शहीद; कृष्णा घाटी सेक्टरमध्ये चकमकीत 2 अतिरेकी ठार

श्रीनगर : वृत्त संस्था – Jammu and Kashmir|काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सुरु असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान भारतीय सैन्य दलातील जवान कृष्ण वैद्य हे शहीद झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टर, बालाकोट सेक्टर आणि मनकोट सेक्टर परिसरात दहशतवाद्यांच्या विरोधात सैन्य दलाकडून मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरु आहे.

२३ जुलै रोजी दुपारपासून एक तुकडी कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन (Search Operation) करत होती. यावेळी सर्च ऑपरेशन (Search Operations) तुकडीला नेमके किती दहशतवादी लपले आहेत, याची माहिती नव्हती. यावेळी अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरवात केली. त्यात कृष्ण वैद्य हे शहीद झाले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) शनिवारी सकाळीही सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु आहे. पोलीस आणि सैन्य दलाकडून झालेल्या गोळीबार दोन दहशतवादी (terrorists) ठार झाले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. ही चकमक अजूनही सुरु आहे.

Web Title : Jammu and Kashmir | awan Krishna Vaidya martyred in search operation against terrorists