आतंकवाद्यांसह पकडला गेलेला DSP देविंदर सिंह राष्ट्रपती पुरस्कार विजेता, अफजल गुरूनं देखील घेतलं होतं नाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर च्या पोलिसांनी कुलगाम मध्ये चेकिंग करताना हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांना पकडले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे दहशतवाद्यांबरोबर कारमध्ये जम्मू काश्मीर पोलीस चे डीएसपी देविंदर सिंह हे देखील होते. त्यामुळे दहशतवाद्यांसमवेत त्यांनाही पकडण्यात आले. विशेष म्हणजे देविंदर सिंग हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहेत. त्यांना दहशतवाद्यांच्या विरुद्ध सफल ऑपरेशन केल्यामुळे इन्स्पेक्टर च्या पदावरून डीएसपी बनवले गेले होते.

कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंडमधील मीर बाजारजवळ शनिवारी दुपारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. दक्षिण काश्मीरचे डीआयजी अतुल गोयल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका कारला घेरले, ज्यात डीएसपी व दोन दहशतवादी सवार होते. पकडलेल्या दहशतवाद्यांपैकी सय्यद नावेद मुश्ताक उर्फ नवीद बाबू हा हिजबुलचा टॉप कमांडर आहे, तर दुसरा दहशतवादी असिफ राथर तीन वर्षांपूर्वी दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. दोघेही शोपियां चे रहिवासी आहेत. या तिघांना पकडण्यात आलेलया पांढऱ्या मारुती कारमधून दोन AK-47 आणि एक हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.

घरात देखील मिळाले हत्यार
पोलीस अधिकाऱ्याने याबाबतीत चुप्पी साधली असून गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार देविंदर यांना अटक केल्यानंतर श्रीनगर मधील त्यांच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकला तर त्यांच्या घरातून AK-47 रायफल, दोन पिस्तूल आणि तीन हॅन्ड ग्रेनेड सापडले. श्रीनगरमधील त्यांचे निवासस्थान बदामी बाग येथील लष्कराच्या मुख्यालयाजवळ अत्यंत संरक्षित असलेल्या शिवपोरा येथे आहे. सूत्रांनी सांगितले की दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राळ येथील त्याच्या वडिलोपार्जित घरातही छापा टाकण्यात आला आहे.

अफजल गुरूंनी देखील घेतले होते त्यांचे नाव
देविंदर सिंग चे नाव २००१ मधील संसद हल्ला प्रकरणात देखील चर्चेत होते. या घटनेतील मुख्य आरोपी अफजल गुरु याने आपल्या वकिलास लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की बडगामच्या हमहमा येथे तैनात डीएसपी देविंदर सिंह यांनी हल्लेखोर मोहम्मदला दिल्लीला नेण्यासाठी, एक फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी आणि कार खरीदण्यासाठी दबाव आणला होता. 9 फेब्रुवारी 2013 रोजी अफझल गुरूला फाशी दिल्यानंतर अफझलच्या कुटूंबाने हे जाहीर केले होते.

नावेद देखील होता जम्मू काश्मीर पोलीस चा कॉन्स्टेबल
विशेष म्हणजे पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी नावेद, जो की आता हिजबुल चा साउथ कश्मीर ऑपरेशनल कमांडर आहे, तो देखील जम्मू काश्मीर पोलीस मध्ये एकेकाळी कॉन्स्टेबल राहिलेला आहे. 2017 मध्ये तो बडगाममधील फूड अँड सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंट स्टोअरमध्ये गार्ड ड्युटीवर होता. तो तेथून AK-47 रायफल घेऊन पळून गेला आणि हिजबुलमध्ये सामील झाला. गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, हिजबुलमधे नावेदची बऱ्यापैकी वजन होते. दक्षिण काश्मीरमध्ये तो विभागीय कमांडर रियाझ नाईकू याच्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर येत होता. तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये देखील सहभागी होता.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/