जम्मू विमानतळावर मोठा स्फोट ! एका पाठोपाठ झाले 2 स्फोट

जम्मू : जम्मू (Jammu and Kashmir Explosion) विमानतळाच्या तांत्रिक भागामध्ये रविवारी पहाटे जोरदार आणि शक्तीशाली स्फोट झाला. एका पाठोपाठ दोन स्फोटाचे आवाज ऐकण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस आणि सुरक्षा अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून सध्या तपास सुरु आहे.

प्राथमिक माहितीनुसार जम्मू विमानतळाच्या तांत्रिक भागामध्ये पहाटे पावणेदोन वाजता हे स्फोट झाले. पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवरुन टाकल्या गेलेल्या वस्तूचा स्फोट झाला. दुसरा स्फोट जमिनीवर झाला.

अद्याप कोणत्याही जीवितहानीची खबर नाही. सुरक्षा दलाने काही मिनिटातच हा सर्व भाग सील केला आहे. बॉम्बशोधक व नाशक पथक जम्मू विमानतळाच्या सर्व परिसराची तपासणी करत आहे. जम्मू विमानतळाच्या तांत्रिक क्षेत्रात बॉम्ब विल्हेवाट पथकाने स्फोट घडवून आणले असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काश्मीरच्या प्रश्नांवर सर्वांशी चर्चा केली होती. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्याचवेळी काश्मीरमधील नरवाल परिसरातून एका दहशतवाद्याला पकडून पोलिसांनी त्यांच्याकडून ५ किलो आयईडी जप्त केला आहे.

हे देखील वाचा

OBC Reservasion | रोहिणी खडसे, एकनाथ खडसे यांची सोशल मीडियावर बदनामी, एकावर FIR दाखल; जाणून घ्या

 

Covid Vaccines | कोविड व्हॅक्सीनने प्रजनन क्षमता प्रभावित होते का, वंध्यत्व येते का? केंद्र सरकारने केले स्पष्ट; जाणून घ्या

 

Indian Coast Guard Recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Post Office | फायद्याची गोष्ट ! केवळ 100 रूपयांत घ्या ‘या’ विशेष स्कीमचा लाभ, कर्जाची सुविधा देखील उपलब्ध; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Jammu and Kashmir Explosion | heard inside Jammu airport’s technical area; forensic team reaches the spot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update