लष्कराच्या ‘ऑपरेशन माँ’चा ‘परिणाम’, 50 तरुणांनी सोडला ‘दहशतवाद’ !

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी सांगितले की, दहशतवादी गटांचे नेतृत्व संपवण्यात येत आहे. जैशे ए मोह्हमदच्या नेतृत्वाचा खात्मा करण्यात आलेला आहे.

लेफ्टनंट जनरल ढिल्लन म्हणाले की, दगडफेकीच्या घटना शून्यावर पोहोचल्या आहेत आणि दहशतवाद्यांविरूद्धच्या कारवाईत कोणताही अडथळा नाही. ते म्हणाले की सैन्याने ऑपरेशन माँ सुरू केले आहे, त्याअंतर्गत गेल्या सहा महिन्यांत दहतवाद्यांच्या आईशी बोलल्यानंतर 50 सशस्त्र अतिरेकी बाहेर आले आणि दहशतीचा मार्ग सोडला आणि कुटुंबीयांसह आले अशी माहिती ढिल्लन यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

ढिल्लन यांनी सांगितले की, सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी एकत्रित झालेले आहेत. लॉंच पन्ड्स दहशतवाद्यांनी भरून गेलेले आहेत. त्यांनी म्हंटले की, पाकिस्तान खराब हवामानाचा फायदा घेऊन दहशतवाद्यांच्या मदतीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे.

सध्या लष्कर दहशतवाद्यांना सीमेवरच मारण्याच्या योजनेवर काम करत आहे.तसेच ढिल्लन यांनी येत्या उन्हाळ्यात काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल अशी देखील आशा व्यक्त केली आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा

You might also like