जम्मू-काश्मीर येथील नौशेरामध्ये झालेल्या चकमकीत सातार्‍याचे जवान संदीप सावंत शहीद

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा लाईट इंन्फ्रटीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत हे जम्मू सेक्टरमधील नौशेरा येथे झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत. शहिद संदीप सावंत (वय-25) हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मुंडे गावचे आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी सविता सावंत या आहेत.

नवीन वर्षाच्या पहाटे संदीप यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेवरील जंगलात हालचाली दिसल्या. सावंत आणि पथकातील अन्य सहकारी तात्काळ त्या दिशेने गेले. त्यावेळी दहशतवादी घुसखोरी करीत असल्याचे दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे दहशतवाद्यांची संख्या कळू शकली नाही. त्यामुळे नाईक संदीप यांनी पुढे जात हल्ला चढवला.

दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीत सावंत आणि गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे गंभीर जखमी झाले. यातच त्या दोघांना वीरमरण आले. यानंतर संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांची शोधमहिम सुरु असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नौशेरा सेस्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. जम्मू-काश्मीरमध्ये 2019 मध्ये 160 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले तर 120 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?