दहशतवाद्यांकडून नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यावर गोळीबार

श्रीनगर : वृत्तसंस्था – दहशतवाद्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या एका नेत्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या बिजबेहरा ब्लॉकचे अध्यक्ष मोहम्मद इस्माईल वानी यांच्यावर गोळीबार केला आहे. या हल्ल्यामध्ये मोहम्मद वानी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे .

निवडणुकीची घोषणा झाली असतानाच आणि सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरु असताना घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रक्रियेत बाधा घालण्याचे काम दहशतवाद्यांकडून सुरु आहे. मोहम्मद वानी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी मोहम्मद वानी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती ट्विटर वरुन दिली आहे.

मोहम्मद इस्माईल वाणी यांच्यावर बिजभेरामधील ताजीवारा येथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. वाणी यांना तत्काळ श्रीनगरमधील एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

You might also like