पुलवामात चकमक सुरु ! पोलीस आणि सुरक्षा दलांनी घेरले 3 दहशतवाद्यांना

पुलवामा : दहशतवाद्यांचा गड बनलेल्या पुलवामा भागातील काकापोरा येथे पोलीस, सुरक्षा दलांबरोबर दहशतवाद्यांची चकमक सुरु झाली आहे.

पुलवामा हा भाग दहशतवाद्यांचा छायेखाली असून या भागात अनेक दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यावरुन पोलीस व सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन सुरु केले. यावेळी एका ठिकाणी दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलीस, सुरक्षा दलाच्या पथकाद्वारे कारवाई सुरु केली. ही कारवाई अद्याप सुरु असून सुरक्षा दलाच्या पथकाने तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. अद्याप कारवाई सुरु आहे.

Advt.