Jammu And Kashmir Police | जम्मू-काश्मीरात PSI ची हत्या; अपहरणानंतर दहशतवाद्यांनी केलं ठार

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था – Jammu And Kashmir Police | जम्मू-काश्मीर पोलीस दलामधील एका पोलिस उपनिरीक्षकाचा (PSI) मृतदेह भातशेतीत पडलेला आढळला (Jammu And Kashmir Police) आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांनी (Terrorists) ही घटना घडवून आणल्याचं बोललं जात आहे. फारुख अहमद मीर (Farooq Ahmad Mir) (रा. सांबुरा पंपोर) असं पोलिस अधिका-याचं नाव आहे. मृतदेह पाहिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षकाचे अपहरण (Abduction) करून निर्जन स्थळी नेण्यात आलं होतं, त्यानंतर गोळ्या झाडून मृतदेह फेकून दिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

 

या घटनेनंतर स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पीएसआय फारुखचा मृतदेह सांबुरा येथील भाताच्या शेतात पडलेला आढळला. फारुख सध्या लेथपोरा इथं 23 Bn IRP मध्ये OSI म्हणून तैनात होते. असं पोलिसांनी सांगितलं आहे.

 

दरम्यान, एक दोन दिवसाआधी अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला होता. यात एक तरुण जखमी झाला. ही घटना पडशाही बाग परिसरात घडली आहे. अहमदउल्ला (Ahmadullah) असं जखमी (Injured) पोलिसाचं नाव असून तो हेड कॉन्स्टेबल (Head Constable) होता. मागील दोन महिन्यामध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगच्या जवळपास सहा घटना घडल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांसाठी दहशतवादी हे नवं आव्हान बनलं आहे.

 

Advt.

Web Title :- Jammu And Kashmir Police | dead body of police sub inspector of
jammu kashmir police found in paddy fields believed killed by terrorists

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा