जम्मू-काश्मीर पोलिसांच्या नव्या जवानांनी पहिल्यांदाच घेतली भारतीय संविधानाची ‘शपथ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम 370 काढून टाकल्यानंतर, प्रथमच काश्मीर खोऱ्यात झालेल्या पहिल्या पासिंग आउट परेडमध्ये राज्य पोलिसात सामील झालेले सैनिकांनी पहिल्यांदाच आय-ए-हिंद अंतर्गत संविधानिक पद्दतीने शपत घेतली. यावेळी कमांडो ताबीर अहमद म्हणाले की, “आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदी दिवस आहे आणि आमच्याकडे बर्‍याच नवीन गोष्टी दिसत आहेत.” ते म्हणाले की आज जम्मू-काश्मीर पोलिसांची ही आमची पहिली तुकडी आहे, जे आय-ई-हिंद अंतर्गत शपथ घेत आहेत.

लोकांचे दुःख समजून घेऊन त्यांना मदत करणे हेच आमचे उद्देश असल्याचे ताबीर यांनी सांगितले. तसेच कमांडो होण्यासाठी आम्हाला उच्चस्तरीय ट्रेंनिंग देण्यात आल्याचे मत हबिबुल्ला खान यांनी व्यक्त केले. खान म्हणाले की आज आम्ही आय-ए-हिंदची शपथ घेतली आहे आणि त्याअंतर्गत आम्ही लोकांचे जीवन व संपत्ती जपण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपण आपल्या देशाचे रक्षण करू.

कमांडो मन्नू शर्मा यांनी सांगितले की, आज खूप गर्व होत आहे की देशाच्या रक्षणासाठी शपत घेतली आहे. तसेच आमच्यासाठी आधी देश महत्वाचा असल्याचे मत कमांडो शर्मा यांनी व्यक्त केले आहे. प्रक्षिक्षक अहमद यांनी सांगितले की, प्रत्येक परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही प्रकारच्या हत्याराने लढण्यासाठी या कमांडोना टट्रेनिंग देण्यात आलेले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे, उपराज्यपाल जीसी मुर्मू यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांचे कौतुक करत म्हणाले, ‘तुम्ही नेहमीच देशाचे नाव उंचावले आहे.’उपराज्यपाल यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांना आश्वासन दिले की वेलफेयरसाठी प्रत्येक पाऊल उचलले जाईल.

सैनिकांच्या चांगल्या आयुष्यापासून त्यांच्या कुटूंबाच्या उन्नतीसाठीही पावले उचलली जातील. यावेळी उपस्थित असलेले डीजीपी जम्मू-काश्मीर दिलबग सिंह यांनी पंतप्रधानांनी जवान आणि जम्मू काश्मीरच्या पोलिसांबाबत नेहमीच कार्यक्षम राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like