जम्मू काश्मीर : अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचा CRPF जवानांवर हल्ला, ५ जवान शहीद

अनंतनाग : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये केपी रोडवर दहशतवाद्यांनी सीआरपीएफवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबारी सुरु झाली. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले. तसेच एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग येथील केपी रोडवर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका ताफ्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या जवानांसह पोलीस जखमी झाले. यानंतर सीआरपीएफ जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सध्या या ठिकाणी दोन्ही बाजूंनी गोळीबारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

https://twitter.com/ANI/status/1138800728896524289

जवानांनी दहशवाद्यांना दिलेल्या प्रतिउत्तरात एक दहशतवादी ठार झाला. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. दहशतवाद्यांनी दोन ग्रेनेडने हल्ले करून अ‍ॅटोमॅटीक रायफल्सने गोळीबारी सुरु केली. यामध्ये जखमी झालेल्या जवान आणि पोलिसांना श्रीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या हल्ल्यामध्य अरशद अहमद हे पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य