श्रीनगरमध्ये लँडलाईन तर जम्मू मध्ये 2G इंटरनेट सुरु, अजूनही काही भागात ‘जमाव’बंदी लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तेथील इंटरनेट आणि टेलिफोन सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र आज शनिवारी सकाळी जम्मू काश्मीरमध्ये टेलिफोन लाईन सुरु करण्यात आली होती तर जम्मूमध्ये २G इंटरनेट सेवाही सुरु करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये अद्याप इंटरनेट सुरु होण्यासाठी थोडा अवधी लागणार आहे.

जम्मू सोबतच संबा, कठुआ, उधमपुर येथेही इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. राजौरीमध्ये रात्री ९ ते सकाळी ५ पर्यंत कलम १४४ लागू राहणार आहे. ५ ऑगस्ट पासून जम्मूतील इंटरनेट सेवा बंद होती. आता सोमवार पासून शाळा, कॉलेज सुरु करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

कलम ३७० रद्द केल्यानंतर बऱ्याच ठीकाणी १४४ लागू करण्यात आले होते. तणावाचे वातावरण शांत करण्यासाठी सक्ती लावल्यानंतर संचार बंदी सुरु करण्यात आली होती.

१६ ऑगस्टला प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आता परिस्थिती शांत असल्याचे सांगितले होते. काही काही भागांमध्ये गोंधळ करण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली होती. मात्र आता हळूहळू स्थिती पूर्ववत होत आहे. सगळीकडे शांततेचे वातावरण असून हळूहळू सर्व भागातील फोन आणि इंटरनेट सेवा सुरु होईल.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like