जम्मू-काश्मीरात मिनी सचिवालयावर दहशतवादी हल्ला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जम्मू-काश्मीरातील शोपियानमधील मिनी सचिवालयावर आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी मिनी सचिवालयाच्या मुख्य गेटवर सीआरपीएफच्या जवांनांवर निशाणा साधत फायरिंग केली. त्यावर भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यात आले आहे .

दहशतवाद्यांनी आजूबाजूच्या परिसराचा लपण्यासाठी आसरा घेतला होता. त्यानंतर जवानांनी जादा फोर्स मागवत त्या संपूर्ण परिसरात सीआरपीएफच्या जवानांनी तपास अभियान सुरु केले आहे. अद्याप कोणत्याही दहशतवाद्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली नाही. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचीही माहितीही मिळालेली नाही.

गोळीबार झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दहशत पसरली आहे. काश्मीरमधून दररोज सीमाभागांत सीजफायरचे उल्लंघन किंवा दहशतवादी हल्ल्याचे वृत्त आहे. भारताने सीआयसीएच्या डिजिटल बैठकीत काश्मीर मुद्द्या उपस्थित केल्यामुळे पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहे. इस्लामाबादला ’थेट आणि अप्रत्यक्ष’ सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करण्याचा सल्ला देण्यात आला.